ठाणे : ज्वेलर्स, साड्यांची दुकाने तसेच ब्युटीपार्लरमध्ये व्यावसायिकांची नजर चुकवून हातचलाखीने महागड्या वस्तूंची लूटमार करणा-या दीपाली रोकडे (३४, रा. शांतीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) आणि नयना ऊर्फ गुड्डी साबळे (२३) या दोन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी अटक केली. त्यांना ४ फेब्रुवारी २०१९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने गुरुवारी दिले.गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या परिसरामध्ये हातचलाखीने वस्तू चोरणा-या महिलांच्या या जोडगोळीने दुकानांमध्ये धुमाकूळ घातला होता. ब्युटीपार्लर, ज्वेलर्स, मॉलमधील दुकाने आणि साड्यांच्या दुकानातील गि-हाईक, दुकानदार आणि कर्मचा-यांची नजर चुकवून महागड्या पर्स, बॅग, दागिने आणि साड्या अशा वस्तू या दोघी चोरत होत्या. एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेºयातील फुटेजच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकाने त्यांना ठाणे पूर्व भागातील कोपरी येथून ३० जानेवारी रोजी अटक केली. त्यांनी मुंबईसह वाशी, महात्मा फुले चौक, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर आदी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील ब्युटीपार्लर आणि दुकानांमध्ये हातचलाखीने चोरी केल्याची कबुली दिली. मुंबईमध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.उल्हासनगर येथील कांता राजपूत यांच्या ब्युटीपार्लरमधूनही त्यांनी १ नोव्हेंबर २०१८ रोजी अशाच प्रकारे आठ हजारांची रोकड, मोबाइल आणि इतर वस्तू असा २२ हजारांचा ऐवज चोरल्याचेही पोलीस चौकशीमध्ये उघड झाले. याच दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे खंडणीविरोधी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. गुड्डीच्या वडिलांचे निधन झाले असून तिची आईदेखील अशा प्रकारे चोºया करण्यात माहीर होती, अशीही माहिती पोलिसांनी दिली. दोघींच्या टोळीतील सहकारी महिलांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शर्मा यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
ब्युटीपार्लरसह ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 9:45 PM
दुकानांमध्ये गिºहाईक म्हणून शिरकाव केल्यानंतर महागडया वस्तूंची हातचलाखीने लुटमार करणाºया दीपाली रोकडे आणि नयना उर्फ गुड्डी कांबळे या सराईत चोरटया महिलांना ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली आहे.
ठळक मुद्देहातसफाईने केलेली चोरी सीसीटीव्हीमध्ये कैदठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाईअनेक चो-यांमध्ये सहभाग असल्याचेही उघड