- सदानंद नाईक उल्हासनगर : मध्यवर्ती पोलिस स्टेशनच्या बॅरेकमधील महिला तक्रार निवारण कक्षात अर्जदार व विरोधी पक्षात तुडुंब हाणामारी झाली. एकमेकांना चाकू दाखविण्यापर्यंत पोहचलेल्या या हाणामारीत महिला पोलीस व समुपदेशिकाही जखमी झाल्या.पोलिस नाईक सुलक्षणा चंदनशिवे यांनी अर्जदार व गैरअर्जदार समीर चांगले व सचिन मुर्तुडकर यांना चौकशी व आपापले म्हणणे मांडण्यासाठी बोलाविले होते. दुपारी सव्वाबारा वाजता दोंघाची चौकशी सुरू असताना, त्यावेळी बाहेर बसलेल्या ८-९ जणांनी महिला तक्रार निवारण कं्रेद्रात धाव घेऊन हाणामारी सुरू केली. त्यांनी एकमेकावर चाकू दाखवून कक्षातील सामानाची तोडफोड केली. अर्जदार व गैरअर्जदार यांना समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस नाईक सुलक्षणा चंदणशिवे व समुपदेशिका संजीवणी भानुशाली यांच्याही हाताला मार लागला आहे. पोलिस नाईक सुलक्षणा चंदनशिवे यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलिसांनी अर्जदार व गैरअर्जदार समिर चांगले यांच्यासह सचिन मुर्तूडकर व त्यांच्या ८- ९ सहकाºयांविरोधात गुन्हा दाखल केला. मध्यवर्ती पोलिस अधिक तपास करीत आहेत. मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या बॅरेकमध्ये महिला तक्रार निवारण केंद्र असून कक्षासमोरच पोलिस परिमंडळ-४ चे पोलिस नियंत्रण कक्ष आहे. तसेच शेजारील रूम मध्ये पोलिस उपायुक्त संजीव गोयल यांचे कार्यालय आहे. अशा ठिकाणी घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.
उल्हासनगर महिला तक्रार निवारण कक्षात राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 5:55 AM