उल्हासनगर : ५० मजूर आणि जेसीबीच्या मदतीने उल्हास नदी जलपर्णी मुक्त केल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे यांनी दिली. जलपर्णी काढल्याने नदीचे पाणी स्वच्छ होऊन हजारो माशांना जीवदान मिळाले आहे.उल्हासनगरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला उन्हाळ्यात जलपर्णीचा विळखा बसून हजारो मासे मृत्यूमुखी पडले. तसेच लाखो नागरिकांना प्रदूषित पाण्याचा पुरवठा झाला. सामाजिक संस्थेने याविरोधात आवाज उठवून जलपर्णी काढण्याचे काम संस्था पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुरू केले. त्यानंतर उल्हासनगर महापालिकेसह पाटबंधारे विभागाला जाग आली. पालिका पाणी पुरवठा विभागाने जेसीबी मशीन, डंपर आणि ५० मजुरांच्या सहाय्याने जलपर्णी काढून एका आठवड्यात नदीला जलपर्णीमुक्त केले. उन्हाळ्यापूर्वी नदी पात्रातील जलपर्णी वनस्पती काढण्याचे काम पाटबंधारे विभागासह संबंधित महापालिकांनी करायला हवे होते. मात्र तसे न झाल्याने नदीतील पाणी प्रदूषित झाले.शहरातील सेंच्युरी कंपनीजवळ उल्हास नदीत एमआयडीसीचे पंपिंग मशीन असून येथूनच लाखो नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. पंपिंग स्टेशन येथील उल्हास नदीतील विहिरीला जलपर्णीने विळखा विळखा घातला होता. जलपर्णी, केरकचरा, प्लास्टिश पिशव्या या मशीनमध्ये अडकल्याने अनेकदा पंपिंग मशीन बंद करण्याची वेळ एमआयडीसीवर आली. त्यामुळे पुरवठा करण्यावर मर्यादा आली होती. जलपर्णी काढल्याने नदीचे पाणी स्वच्छ झाले. पाटबंधारे विभागासह उल्हासनगर महापालिकेने जलपर्णी काढण्याचे काम सुरू करून नदीला जलपर्णी मुक्त केल्याची माहिती कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे यांनी दिली आहे.जलपर्णीला सामाजिक संस्थेचा हातभारउल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पडून नदीचा श्वास कोंडून हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याचा आरोप सामाजिक संस्थेने केला. तसेच महाराष्टÑ दिनी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी जलपर्णी काढण्यासाठी नदीत उतरले.
उल्हास नदी झाली जलपर्णीमुक्त, पाणी झाले स्वच्छ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 12:51 AM