उल्हासनगर : तहसील कार्यालय शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या प्रशासकीय इमारतीच्या उदघाटनापूर्वीच तहसील कार्यालय, संजय गांधी निराधर विभाग इमारतीत स्थलांतरित झाले असून त्यापूर्वी इमारतीत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना ठेवले जात होते. उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात नागरिकांना सोयीस्कर पडेल अश्या तहसील कार्यालय शेजारी प्रशासकीय इमारत बांधण्यात आली असून इमारती मध्ये विखुरलेले शासकीय कार्यालये सुरू करण्याची संकल्पना शासनाची आहे. इमारत उभी राहून तीन वर्षे पूर्वी पूर्ण झाली. मात्र इमारतीचे उदघाटन होण्यापूर्वी तहसील कार्यालयसह संजय गांधी निराधार कार्यालय सुरू होऊन इतर कार्यालय लवकरच सुरवात होणार आहे. भूमापन कार्यालय, वजन मापे कार्यालय, शिधा वाटप कार्यालय आदी कार्यालय नवीण कार्यालय प्रशासकीय इमातीमध्ये सुरू होणार आहेत. तहसील कार्यालायाने धाडस दाखवून कार्यालय सुरू केले. त्या पाठोपाठ इतर शासकीय कार्यलय सुरू केले.
शहरात लहान मोठे शासकीय कार्यालय विखुरलेले असून नागरिकांच्या सुखसुविधेसाठी सर्व शासकीय कार्यालय एकाच इमारती मध्ये येण्यासाठी तहसील कार्यालय शेजारी तीन मजल्याची इमारत बांधण्यात आली की. इमारत गेल्या तीन वर्षापासुन बांधून उभी आहे. मोठया राजकीय नेत्यांच्या हस्ते इमारतीचे उडघटना अभावी पडून आहे. अखेर तहसिलदार कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीचा हलवून तेथून कार्यालयाचा कारभार हाकलला जातो. तसेच संजय गांधी निराधार कार्यालयसह निवडणूक कार्यालय प्रशासकीय कार्यालयात गेले. इमारत वापरा विना पडून असल्याने, इमारतीला गळती लागल्याचे चित्र आहे.