शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

उल्हासनगर बनते क्रिकेट सट्ट्याचे शहर, गेल्या आठवड्यात क्रिकेट बेटिंगचे ३ गुन्हे

By सदानंद नाईक | Published: May 10, 2024 6:17 PM

तीन जणां विरुद्ध गुन्हे दाखल

सदानंद नाईक, उल्हासनगर : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला. गेल्या एका आठवड्यात क्रिकेट बेटिंगचे ३ गुन्हे उघड झाल्याने, क्रिकेट सट्टयाचे शहर म्हणून उल्हासनगर नावारूपाला येते की काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-३, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अचल पॅलेस हॉटेलच्या समोर व द्वारका पॅलेस इमारतीच्या रुम नं-१०३ मध्ये अचल ग्यानसिंग यादव, विजय पुरोषतम डेंगरा आणि राज या तिघांनी आपसात संगणमत करून क्रिकेट सट्टा खेळत होते. त्यांनी ऑलपेने्लेक्सच डॉट कॉम, टायग्रेक्सचं २४७ डॉट वीआयपी या वेबसाईटवरील सनाया २५१२ युजर् आयडी व पासवर्डचा वापर करून, गुगल क्रॉम ब्राऊजर मध्ये आयपीएल क्रिकेट सामान्यावर क्रिकेट बेटिंगद्वारे लाखो रुपयांचा सट्टा खेळण्यात येत होता.

ही बेटिंग लखनऊ सुपरजायन्ट आणि हेद्राबाद सनराईजर्स या सामन्यावरील होणाऱ्या टी-२० मॅचवर मोबाईलद्वारे खेळण्यात येत होता. क्रिकेट बेटिंग करणारा विजय डेंगरा याने या सामन्यावर २५ लाख ६१ हजार ९०० पॉइंटचे बेटिंग लावले होते. त्यात १५५ जणं क्रिकेट बेटिंग खेळताना आढळून आले. मध्यवर्ती पोलिसांना या क्रिकेट बेटिंगची माहिती मिळताच त्यांनी अचल पॅलेस हॉटेल समोर सापळा रचून क्रिकेट सट्टयाच्या अड्ड्यावर धाड टाकून क्रिकेट सट्टयाचा पर्दाफास केला. 

शहरात क्रिकेट सट्टा खेळणारे अचल यादव, विजय डेंगरा आणि राज मलिक यांच्या विरुद्ध मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गेल्या एका आठवड्यात ३ क्रिकेट सट्टयाचे गुन्हे दाखल झाले असून यापूर्वीही क्रिकेट सट्टाचे गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले. क्रिकेट बेटिंग उघड झाल्याने, उल्हासनगर क्रिकेट सट्टयाचे शहर म्हणून नाव रुपाला येते की काय? असा प्रश्न उपस्थित निर्माण झाला आहे. 

क्रिकेट सट्टयावर कारवाई सुरूच...पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे 

शहरात गेल्या आठवड्यात एकून ३ क्रिकेट सट्टयावर धाड टाकून अनेकांना अटक केली. यापूर्वीही क्रिकेट सट्टयावर पोलिसांनी कारवाई केली असून या क्रिकेट सट्टयात कोणताही राजकीय नेता व पदाधिकार्यांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कोणाचाही सहभाग तपासात आढळला नाही. मात्र पोलीस याप्रकरणी सखोल चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी