उल्हासनगर - सेंच्युरी रेयाँन कंपनीच्या आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा २० ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पार पडल्या आहेत. रविवार स्पर्धेचा समारोप रामलीला मैदानात संपन्न झाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिली.
उल्हासनगर शहाड गावठण येथील सेंच्युरी रेयाँन कंपनीच्या वतीने रामलिला मैदानात २० ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा पार पडली. यामध्ये क्रीकेट, फुटबॉल, हाँलीबाँल, खो-खो आदि विविध क्रीडा स्पर्धा होत्या. स्पर्धेत कंपनीच्या रेयाँन आणी टायरकाँर्ड विभागातील एकुण ३०० अधिकाऱ्यासह कर्मचारी या स्पर्धेत सहभागी झाले होते. विजेत्या स्पर्धेकांचे कंपनीचे युनिट हेड दिग्विजय पांडे, श्रीकांत गोरे, ए.के. सहेल आदी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कामगार युनियनचे अध्यक्ष रवींद्र कोनकर, महामंत्री रमेश यादव, पदाधिकारी कुष्णा पाटील व कामगार युनियनचे पदाधिकारी आणी शेकडो कामगार,खेळाडू मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
सेंच्युरी कंपनीच्या कामगारामध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवुन कंपनीच्या वतीने क्रीडा स्पर्धेचे आयोजण केल्याचे मनोगत सेच्युरी रेयाँन कंपनीचे एच.आर.प्रमुख श्रीकांत गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दरवर्षी अश्या स्पर्धा कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात येत असुन कामगार व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याची माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहूल लालका यांनी दिली आहे.