उल्हासनगर - निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाने दुपारी 4 वाजता शांतीनगर नाक्यावर एटीएम गाडीतुन 71 लाखाची रोखड जप्त केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.उल्हासनगर निवडणूक भरारी पथकाचे नोडल अधिकारी युवराज भदाणे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 4 वाजता शांतीनगर नाक्यावरून जाणाऱ्या एटीएम गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये 71 लाखाची रोखड आढळली. 71 लाखाच्या रोखड बाबत कारचालक रामदास पवार यांना विचारणा केलीअसता, त्याने समाधानकारक उत्तरे देता आली नाही. युवराज भदाणे यांनी पथक प्रमुख उद्धव वानखडे, कर्मचारी महेश वालाणी तसेच पोलिस कर्मचारी गणेश राठोड यांच्या मदतीने रोखडसह रामदास पवार, चंद्रकांत पाटील, सोनम कुंभार व योगेश जगताप यांना मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिले.मध्यवर्ती पोलीसानी 71 लाख रोखडसह चार जणांना ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू केली आहे. निवडणूक भरारी पथकाचे नोडल अधिकारी युवराज भदाणे यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी वेगवेगळ्या तीन घटनेत 15 लाख 60 हजाराची बेहिशोबी रोखड पकडून दिली आहे. उल्हासनगर निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाचे धसका राजकीय पक्षासह व्यापाऱ्यांनी घेतला असून व्यापारी संघटनेचे पदाधिकारी दीपक छटवानी यांनी रेकॉर्ड अथवा बिलासह रोकड नेवू नये, असे आवाहन शहरातील व्यापाऱ्यांना केले आहे.
उल्हासनागरात निवडणूक भरारी पथकाने 71 लाखाची रोखड पकडली, मध्यवर्ती पोलिसात नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 8:35 PM