शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

उल्हासनगर गोळीबार: जखमी महेश गायकवाड यांच्या तब्येतीत सुधारणा; श्रीकांत शिंदेंनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 10:51 AM

हिललाईन पोलीस ठाण्यातच भाजपा आमदाराने केलेल्या गोळीबारात झाले होते जखमी

Ganpat Gaikwad vs Mahesh Gaikwad, Shrikant Shinde: उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी, गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील जखमी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळाली आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज महेश गायकवाड यांची रुग्णलयात जाऊन चौकशी केली. गोळीबाराची घटना घडताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरही श्रीकांत शिंदे तब्येतीची विचारपूस करायला उपस्थित होते. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी ज्युपिटर रूग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शुक्रवारी घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली.  झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे यांच्यासह संदीप सरवनकर यांना अटक करून त्यांना न्यायालयाने १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. तसेच गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींच्या तपासासाठी ६ पथके तैनात केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त शिवाजी पाटील यांनी दिली आहे. जखमी महेश गायकवाड व राहुल पाटील यांची साक्ष घेतली नसल्याची माहितीही पाटील यांनी दिली. या घटनेचे पडसाद राज्यासह देशात उमटले असून आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवनकर, वैभव गायकवाड, नागेश बेडेकर, विकी गणोत्रा यांच्यासह अन्य जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.

टॅग्स :Ganpat Gaikwadगणपत गायकवाडMahesh Gaikwadमहेश गायकवाडulhasnagarउल्हासनगरFiringगोळीबारShrikant Shindeश्रीकांत शिंदे