उल्हासनगर : एमआयडीसीची पाणीकपात ६५ टक्क्यांवर गेल्याने दोन दिवस पाणीपुरवठा पूर्ण बंद आणि उरलेल्या चार दिवसांत विभागवार पाणीवाटपामुळे नागरिकांना अवघे दोन दिवस, तेही कमी दाबाने पाणी देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी तयार केला आहे. या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळाली नसली, तरी एकंदर पाणीटंचाई पाहता याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसल्याचे आणि तीव्र टंचाईच्या भागात टँकर पाठवण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी विहिरी, बोअरवेल, हातपंपांवर अवलंबून राहावे लागणार आहे. सध्या टंचाईमुळे शहराच्या पूर्व भागात गुरुवारी आणि शुक्रवारी, तर पश्चिमेत मंगळवारी, शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. त्यामुळे नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन चार दिवसांत पुरवून पाणी कसे वितरीत करायचे, याचा आराखडा तयार केल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली. कॅम्प-५ ला शनिवारी व सोमवारी, कॅम्प-४ ला रविवारी व मंगळवारी पाणीपुरवठा करण्याचा विचार सुरू आहे. अतिटंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. १मुंब्रा येथील पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही तर शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा राकाँपाच्या पदाधिकाऱ्यांनी महापे येथे दिला. मुंब्रा-कौसा भागातील नागरिकांना किमान दैनंदिन गरजा पूर्ण करण्याएवढा पाणीपुरवठा करावा. पाणीकपात चारऐवजी दोन दिवस करावी. २शुक्र वारी पाणीकपात करण्यात येऊ नये, या मागण्यांसाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राकाँपाने गुरु वारी एमआयडीसीच्या म्हापे येथील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला होता. या वेळी कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी वरील भागातील पाणीकपात चारऐवजी तीन दिवस करण्याचे तसेच दाब वाढविण्याचे आणि शुक्रवारी पाणीकपात रद्द करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.३दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून पाणीपुरवठ्यात सुधारणा केली नाही. तर, पूर्वसूचना न देता एमआयडीसी आणि ठामपाच्या मुख्यालयासमोर ढोलताशे वाजवून कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा राकाँपाचे विभागीय अध्यक्ष शमीम खान यांनी दिला. या मोर्चामध्ये किमान वेतन सल्लागार आयोगाचे अध्यक्ष सय्यद अली अशरफ, मुंब्रा प्रभाग समितीचे अध्यक्ष अशरफ पठाण, येथील बहुतांशी नगरसेवक, नगरसेविका आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते.
उल्हासनगरला दोन दिवस पाणी
By admin | Published: March 11, 2016 2:35 AM