उल्हासनगर : मनसे शहराध्यक्षासह कार्यकारणीला गेल्या ५ महिन्यापासून मुहूर्त लागत नसल्याने, इच्छुक अर्धा डझन उमेदवारात धकधूक वाढली आहे. पक्षनेते राज ठाकरे यांनी १४ मे रोजी शहर कार्यकारिणी बरखास्त करून एका आठवड्यात नवीन कार्यकारणी घोषित करण्याचे आश्वासन दिले होते.
उल्हासनगर महापालिकेत मनसेचे प्रतिनिधी निवडून आले नसलेतरी, पक्षाचे पदाधिकारी शहरातील विविध समस्यावर आक्रमक भूमिका घेतात. मात्र पक्षातील बेबनाव झाल्याचे कारण देऊन पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शहर कार्यक्रमात एके असताना, मनसेची शहरकार्यकारणी १४ मे रोजी बरखास्त केली होती. तसेच एका आठवड्यात शहाराध्यक्षसह कार्यकारणी घोषित केल्याचे सांगितले होते. त्यानंतर एका आठवड्यात आमदार राजू पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शहरपदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक टॉउन हॉल घेऊन, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. त्यानंतर शहराध्यक्षसह कार्यकारणी घोषित होईल असे वाटत होते. मात्र गेल्या ५ महिन्यापासून शहराध्यक्ष व कार्यकारणी घोषित झाली नाही. याप्रकारने पक्षात मळगळ आल्याचे बोलले जात आहे.
शहराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत माजी शहराध्यक्ष संजय घुगे यांच्यासह शालीग्राम सोनवणे, दिलीप थोरात, बंडू देशमुख, सचिन कदम, मनोज शेलार, प्रदीप गोडसे, सचिन बेंडके, मैनुद्दीन शेख आदींच्या नावाची चर्चा आहे. शहराध्यक्ष पदासाठी अर्धा डझन पेक्षा जास्त स्थानिक नेते इच्छुक असल्याने, पक्ष श्रेष्ठी समोर अध्यक्ष निवडतांना मोठा पेचप्रसंग उभा ठाकला आहे. बाप्पाच्या विसर्जनानंतर शहराध्यक्ष व कार्यकारणी घोषित होणार असल्याचेही बोलले जात आहे. पक्षाने घेतलेल्या निर्णय अंतिम असेल, असे इच्छुक उमेदवारांचे म्हणणे आहे.