उल्हासनगर: पावसाळ्यात आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलाविली. बैठकीला महापालिका अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस विभाग, बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमआयडीसी, बीएसएनएल, महावितरण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगर महापालिकेने स्थापन केलेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीची संयुक्त बैठक शुक्रवारी आयुक्त अजीज शेख यांनी आयोजित केली होती. बैठकीला महापालिका, पोलिस विभाग, वाहतूक पोलिस, आरटीओ, एमएमआरडीए, बीएसएनएल, एमआयडीसी, एमएसईबी, आरोग्य विभाग, मध्यवर्ती रुग्णालय, अग्निशमन आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत महापालिका प्रभाग समिती मध्ये आपत्ती निवारण नियंत्रण कक्षाची स्थापना करणे. नाले सफाईचे काम पूर्ण करणे, एमएमआरडीए व बांधकाम खाते यांचे मार्फत चालू असलेल्या शहरातील सर्व रस्त्यांचे कामे पूर्ण करणे, रस्त्यातील खड्डे भरणे, महावितरण, अग्निशमन विभाग व धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करुन सदरची झाडे छाटण्याचे काम पावसाळयापूर्वी पूर्ण करणे आदी निर्णय बैठकीत घेण्यात आला.
महापालिका सहाय्यक आयुक्तांनी अतीधोकादायक इमारतीना नोटीसा बजावून ती निष्काशीत करणे, यासह अन्य निष्कासनची घटनेचा आढावा घेण्यात आला. तसेच डेंग्यू, मलेरिया या साथीच्या रोग नियंत्रणासाठी यंत्रणा उभारणे. धोकादायक झाडे कापने, ड्रेनेज लाईन आदी समस्याचे निराकरण करण्याचे निर्देश आयुक्तांनी अग्निशमन विभाग व आरोग्य विभागांना दिले.
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी बोलविलेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त किशोर गवस, डॉ. सुभाष जाधव, मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, अग्निशमन अधिकारी बाळू नेटके, प्रभाग अधिकारी गणेश शिपी, दत्तात्रय जाधव, अनिल खतरानी, मनिष हिवरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा, वाहन व परिवहन प्रमुख विनोद केणे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, यशवंत सगळे, सार्वजनिक बांधकाम विभाग, दिप्ती पवार पर्यावरण विभाग प्रमुख विशाखा सावंत आदी जणउपस्थित होते.