शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

उल्हासनगर महापालिका : सत्तेसाठी काहीही...

By संदीप प्रधान | Published: September 29, 2018 4:46 AM

भारतीय जनता पार्टीने उल्हासनगरातील डॉन पप्पू कलानी याची सून पंचम यांच्या विजयाकरिता लावलेली फिल्डिंग यशस्वी झाली आणि पंचम या उल्हासनगरच्या महापौर झाल्या.

- संदीप प्रधानभारतीय जनता पार्टीने उल्हासनगरातील डॉन पप्पू कलानी याची सून पंचम यांच्या विजयाकरिता लावलेली फिल्डिंग यशस्वी झाली आणि पंचम या उल्हासनगरच्या महापौर झाल्या. वरकरणी ही अत्यंत साधी, सोपी घटना वाटत असली, तरी राज्यातील सत्ताधारी भाजपा सत्तेमुळे किती कोडगा व निलाजरा बनला आहे, त्याचा हा ढळढळीत पुरावा आहे.भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी १९९० च्या दशकात ‘राजकारणाच्या गुन्हेगारीकरणा’चा मुद्दा उपस्थित करून शरद पवार यांना लक्ष्य केले होते. त्यावेळी पवार काँग्रेसमध्ये होते व केंद्रात संरक्षणमंत्री होते. त्यांनी आपले वारस म्हणून सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्रीपदी बसवले होते. मात्र, ‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी’, या उक्तीप्रमाणे पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या पवारांचा जीव महाराष्ट्रात आणि बारामतीत घुटमळत होता. उल्हासनगरात पप्पू कलानी आणि वसई-विरारमध्ये डॉन भाई ठाकूर हे दोन पवार यांचे विश्वासू चेले होते. त्याच सुमारास जे.जे. इस्पितळात घुसून गोळीबाराची घटना घडली होती. त्याचे धागेदोरे भिवंडीपर्यंत जोडले गेले होते. या कटातील आरोपींचा मुक्काम उल्हासनगरातील एका रिसॉर्टमध्ये होता, अशी चर्चा होती. कलानी उल्हासनगरचे १९९० मध्ये महापौर झाले. दीर्घकाळ तेच या पदावर होेते. या काळात उल्हासनगरात कलानी यांचा शब्द अंतिम होता. या काळात कलानी विरुद्ध अन्य पक्षांमध्ये झालेल्या संघर्षात घनश्याम भटिजा, इंदर भटिजा, रिपाइंचे मारुती जाधव, शिवसेनेचे गोपाळ राजवानी, दीपक वाधवानी, अशोक बोकळे, माधव ठाणगे, रमेश चव्हाण, बाला सुर्वे, महेंद्र सिंग, अण्णा शेट्टी, सेंच्युरी कंपनीचे कामगार नेते यादव अशा अनेकांच्या हत्या झाल्या. त्यामुळे मुंडे यांनी उचललेला राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा चांगलाच तापला. त्याचवेळी दाऊद इब्राहिमच्या बेकायदा इमारतींविरुद्ध तत्कालीन महापालिका उपायुक्त गो.रा. खैरनार यांनी कारवाईचा हातोडा उचलला. मात्र, ही कारवाई रोखण्यात आली. त्यामुळे खैरनार यांनी पवार यांच्याविरोधात रणशिंग फुंकले. खैरनार हे तमाम महाराष्ट्राचे हीरो झाले होते. मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी खैरनार यांच्या जाहीर सभा होत होत्या. त्यामध्ये खैरनार बोलायला उभे राहिले की, खच्चून भरलेली सभागृहे शेम शेमच्या घोषणांनी दुमदुमून जायची. कोपरान्कोपरा माणसांनी भरलेला असायचा. खैरनार यांच्या आरोपांनी मुंडे यांच्या संघर्षाला बळ लाभले. त्याच सुमारास पवार व सुधाकरराव नाईक यांच्यात कमालीचे वितुष्ट निर्माण झाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या दौºयावर असताना नाईक यांनी भर पत्रकार परिषदेत पप्पू कलानीला तुरुंगात मारू नका, असा आदेश पवार यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी विमानतळावर दिल्याचा गौप्यस्फोट केला. पवार यांच्या उरल्यासुरल्या विश्वासार्हतेच्या ठिकºया नाईक यांनी उडवल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शरद पवार हे वरकरणी आपण परस्परांचे विरोधक असल्याचे दाखवत असले, तरी परस्परपूरक राजकारण करत आले. भाजपामधील प्रमोद महाजन हे तर पवार यांचे चांगले मित्र होते. मात्र, मुंडे यांनी पवार यांच्याशी खराखुरा संघर्ष केला. (राज्यात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता असताना अशाच प्रकारे छगन भुजबळ यांनी शिवसेनेबरोबर संघर्ष केला होता. हा संघर्ष इतका टोकाला गेला की, भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली).मुंडे यांनी ज्या कलानी यांना लक्ष्य केले व जे कलानी सध्या आपल्या रक्तरंजित राजकारणाकरिता तुरुंगाची हवा खात आहेत. (इंदर भटिजा खून प्रकरणात पप्पूला शिक्षा झाली आहे.) त्यांचे पुत्र ओमी यांचा पाठिंबा घेऊन दीड-दोन वर्षांपूर्वी भाजपाने सत्ता स्थापन केली. महापौरपदाची पहिली टर्म भाजपाच्या मीना आयलानी यांनी उपभोगली. त्यानंतर, पंचम कलानी यांना महापौरपद देण्याचा वादा भाजपाने केला होता. मात्र, साई पक्षाच्या फुटीर गटाच्या ज्योती भटिजा (घनश्याम भटिजा यांच्या सून) यांना शिवसेनेने पुढे करून भाजपाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. अर्थात, तो फसला.- संबंधित वृत्त/२संरक्षण दलाच्या विमानातून कुख्यात गुंड शर्मा बंधूंनी केलेल्या प्रवासाचे प्रकरण मुंडे यांनी उघड केले. हे शर्मा बंधू मुंबईचे तत्कालीन महापौर रा.रा. सिंह यांचे खास असल्याचा दावा केला गेला. मात्र, ते आपले कुणी नसून तत्कालीन आमदार रमेश दुबे यांचे विश्वासू असल्याचा दावा सिंह यांनी केला.उल्हासनगर महापालिकेचे नगररचनाकार संजीव करपे हे दोन वर्षे बेपत्ता असून त्यांचा तपास लागलेला नाही. करपे यांचीही राजकारणातून हत्या तर झाली नाही ना, असा संशय घ्यायला नक्की जागा आहे. अनेक अधिकाºयांवर लाचलुचपतीसह अनेक गंभीर आरोप आहेत. काही निलंबित आहेत.विलासराव देशमुख, बॅ. ए.आर. अंतुले, रामराव आदिक वगैरे मंडळींनी पवार यांच्याविरोधात उघड बंड केले होतेच. पण, पवार यांचे विश्वासू सुधाकरराव नाईक हेही त्यांच्याविरोधात उभे ठाकले होते. या साºया राजकारणामुळेच १९९५ साली राज्यात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आली.

टॅग्स :Politicsराजकारणulhasnagarउल्हासनगर