सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका आयुक्तांच्या अधिसूचनेनुसार १ फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभागाचा भौगोलिक सीमा जाहीर होणार असून १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेला सुरवात झाल्याने, नगरसेवक व इच्छुक उमेदवारात उत्साह निर्माण झाला आहे.
उल्हासनगर महापालिकेची मुदत ४ एप्रिल रोजी संपत असून सार्वत्रिक निवडणूका मुंबई-ठाणे महापालिका सोबत फेब्रुवारी महिन्यात यापूर्वी घेतल्या आहेत. कोरोना महामारीमुळे निवडणुका बाबत अनिश्चितेचे वातावरण असताना, आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी सोमवारी महापालिकेच्या प्रारूप प्रभागाच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्याबाबत अधिसूचना जाहीर केली. १ फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभागाच्या भौगोलिक सीमा रेषा प्रसिद्ध होणार असून १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्रभागाच्या प्रारूप सीमा बाबत नगरसेवक व इच्छुकांत उत्साह असून नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी दिवाळी पासूनच विविध उपक्रम राबवून निवडणुक तयारीला लागले आहेत.
महापालिकेत यापूर्वी एकून ७८ वॉर्ड तर २० प्रभाग होते. लोकसंख्येच्या प्रमाणात ११ नवीन वॉर्ड वाढल्याने एकून वॉर्डची संख्या ८९ झाली. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली. कोणत्या परिसरात नवीन वॉर्ड वाढले, याबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे. सोमवारी प्रारूप प्रभागाचे भौगोलिक सीमा प्रसिद्ध झाल्यावर हरकती व सूचना मागविण्यात येणार असून ठाणे व मुंबई महापालिके सोबत उल्हासनगर महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. शहर पूर्वेत वॉर्डची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून त्याचा सर्वाधिक फायदा शिवसेनेला होणार. असेही बोलले जात आहे.