सदानंद नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरातील डम्पिंगचा प्रश्न ऐरणीवर आला असताना राज्य शासनाने कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी उसाटणे गावाच्या हद्दीतील ३० एकर जागा देण्याला तत्त्वत: मान्यता दिली. आयुक्त देशमुख आणि मुख्य स्वच्छता निरीक्षक केणे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून डम्पिंगवरील कचºयाचा भार कमी होणार आहे.
उल्हासनगरातील म्हारळगाव, राणा खदाण येथील डम्पिंग ग्राउंड ओव्हरफ्लो झाल्यानंतर, सुरक्षेचा उपाय म्हणून डम्पिंग तात्पुरत्या स्वरूपात कॅम्प नं-५ येथील खडीखदाण येथे हलवण्यात आले. मात्र, स्थानिकांनी डम्पिंगला विरोध केल्यानंतर पालिका पर्यायी जागेच्या शोधात होती. शेजारील उसाटणे गाव येथे एमएमआरडीएची शेकडो एकर जमीन घनकचरा व्यवस्थापनासाठी आरक्षित असून त्यापैकी १०० एकर जागा मुंबई महापालिकेला कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी दिल्याची माहिती तत्कालीन आयुक्तांना मिळाली होती. त्यांनी याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला.
दरम्यान, खडीखदाण येथील डम्पिंग ग्राउंडप्रकरणी राष्टÑीय हरित लवादाकडे स्थानिकांनी जनहित याचिका दाखल केली. त्या सुनावणीवेळी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पालिकेची बाजू मांडत डम्पिंगसाठी भूखंड शिल्लक नसल्याचे सांगितले. तसेच उसाटणे गावाशेजारील ३० एकर जागेचा उल्लेख केला.
राष्टÑीय हरित लवादाच्या आदेशान्वये शुक्रवारी विविध विभागांच्या प्रधान सचिवांनी महापालिकेची बाजू ऐकून घेतली. आयुक्त सुधाकर देशमुख आणि मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी सविस्तर तसेच वास्तव बाजू मांडल्यावर ३० पैकी १५ एकर जागा देण्याला तत्त्वत: मंजुरी दिली. तसेच कचºयावर प्रक्रिया केंद्र उभारल्यावर उर्वरित १५ एकर जागा देण्याचे मान्य केले. यामुळे आता कचºयाचा प्रश्न सुटणार आहे.डम्पिंगचा प्रश्न निकाली निघणार?शहरातील कचºयाचे वर्गीकरण करण्यास पालिकेने सुरुवात केली असून ओल्या आणि सुक्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी उसाटणे गाव हद्दीतील १५ एकर जागेवर प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. परिणामी, डम्पिंगवरील कचºयाच्या प्रमाणात प्रचंड घट होऊन डम्पिंगचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी व्यक्त केली.