उल्हासनगर - महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी मंगळवारी २०१९-२० या वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या सभापती जया माखिजा यांना सादर केले. नऊ लाख शिलकीच्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ न सुचविल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शहर अस्वच्छ करणाऱ्यांना दंडाला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, सातवा वेतन आयोग लागू केल्याने पालिकेच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे.पालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेवर भर दिला असून अस्वच्छता करणाºयांकडून दंड वसूल केला जाणार असून साधारण १२ कोटी उत्पन्न या दंडातून मिळेल असे अपेक्षित धरले आहे. आयुक्तांनी २०१९-२० या वर्षाचा ५४९.४६ कोटीचे उत्पन्न तर ५४९.३७ कोटीचा खर्च असा नऊ लाख शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. परिवहन सेवा सुरू करण्यासाठी आर्थिक तरतूद केली असून १५ मुख्य रस्त्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. तर पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरूस्तीसाठी १० कोटींची तरतूद केली आहे.प्र्रशासकीय खर्च व वेतनापोटी १२२ कोटी, एमआयडीचे देणे-३० कोटी, शहर रोषणाई-१२ कोटी, कचरा वाहतूक-४४ कोटी, उद्याने व मैदानाचा विकास-६ कोटी, महिला व बालकल्याण समिती-९ कोटी, दिव्यागांच्या कल्याणासाठी-२ कोटी, शिक्षण मंडळ-६१ कोटी, बांधकाम विभाग- ५१ कोटी असा एकूण ५४९.३७ कोटीचा खर्च प्रस्तावित आहे.मालमत्ता करापासून-११५ कोटी, पाणीपट्टी-४३ कोटी, एलबीटी व सरकारी विविध अनुदाने-२४३ कोटी, नवीन डीसीआरनुसार एमआरटीपी करातून ९० कोटी असे एकूण ५४९. ४६ कोटीचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. आयुक्त अच्युत हांगे यांनी स्थायी समिती सभापती जया माखिजा यांना यावेळी महापौर पंचम कलानी, विरोधी पक्षनेता धनंजय बोडारे, प्रकाश माखिजा, मुख्य लेखा अधिकारी हरेश इदनानी, जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे आदी उपस्थित होते.कचºयाचे डबे बंधनकारककेंद्र व राज्य सरकारच्या घनकचरा नियमानुसार नागरिकांनी ओला व सुका कचºयासाठी दोन डबे स्वतंत्र ठेवणे बंधनकारक केले आहे. जर नियमांचे पालन केले नाहीतर घरासाठी दरमहा ५० रूपये, दुकाने ७५ रूपये, शोरूम-१०० रूपये, गोदाम १०० रूपये, हॉटेल -१०० रूपये, लॉजिंग १२५ रूपये, रूग्णालय १०० रूपये, शैक्षणिक व धार्मिक संस्था-७५ रूपये, फेरीवाले १५० तर विवाह कार्यालय २५० रूपये दंड आकारण्यात येणार आहे. यातून पालिकेला १२ कोटीचे उत्पन्न प्रस्तावित आहे.असा असेल दंड : रस्त्यात पहिल्या वेळेस थुंकणाºयाला ५० रूपये, दुसºया वेळेस १०० तिसºयावेळेस १५० रूपये, पहिल्यांदा कचरा टाकल्यास तीन हजार, दुसºयावेळी सहा हजार व त्यानंतर नऊ हजार रूपये, कचरा जाळल्यास ३०० रूपये दंड आकारला जाणार आहे.
उल्हासनगर महापालिका : अंदाजपत्रकात शहर स्वच्छतेला दिले प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 2:46 AM