उल्हासनगर : महापालिकेला निवडणूक निमित्त पोस्टर्स व बॅनर्सच्या परवानगीतून १४ लाख ५० हजार, ९०६ रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. आजपर्यंत एकूण २४५ पोस्टर्स व बॅनर्सला परवानगी मिळाल्याची माहिती आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेने निवडणूक निमित्त आजपर्यंत एकूण २४५ पोस्टर्स व बॅनरला परवानगी दिली. यामध्ये मालमत्ता विभागाबने दिलेल्या परवानगीची संख्या १०६ आहे. तर बाजार व परवाना विभागाकडून एकूण १३९ अर्जाना परवानगी दिली. पोस्टर्स परवानगी मधून महापालिकेला एकूण १४ लाख ५० हजार ९०६ रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.
प्रत्यक्षात शहरात लावण्यात आलेल्या अनेक पोस्टर्स व बॅनर्सवर महापालिका परवानगी क्रमांक लिहले नसल्याची चर्चा आहे. विनपरवाना लावलेल्या पोस्टर्स व बॅनर्सवर कारवाई करण्याची मागणी नागरिक व सामाजिक संघटनेकडून होत आहे.