शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
4
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
5
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ!
6
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
7
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
8
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
9
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
10
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
11
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
12
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
13
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
14
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
15
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
16
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
17
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
18
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
19
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
20
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी

उल्हासनगरातील लोकांना महापालिकेचा झटका; पाणीपट्टी करात वाढ, ९८८.७२ कोटींचा अर्थसंकल्प सादर

By सदानंद नाईक | Updated: March 24, 2025 19:20 IST

उल्हासनगर महापालिका २०२४-२५ चे ९७७ कोटी ६४ लाखाचा मूळ अर्थसंकल्प सुधारीत करुन आरंभीच्या शिल्लकेसह २०२५-२६ च्या आरंभिच्या शिल्लकेसह ९८८. ७२ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

सदानंद नाईक  उल्हासनगर : पाणीपट्टी करात करवाढ केलेला २०२५-२६ चा ५४ लाख शिलकीसह ९८८. ७२ कोटींचा अर्थसंकल्प सोमवारी उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सादर केला. यात ९८८ कोटी १८ लाख महसुली खर्च आणि ९८८ कोटी ७२ लाख भांडवली खर्चाचा समावेश आहे. स्मार्ट चौक, स्मार्ट रस्ते, स्मार्ट शाळा, स्मार्ट आरोग्य केंद्र, स्मार्ट पार्किंग यांच्यासह पशु वैधकीय दवाखाना, दिव्याग भवन आदी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. महापालिकेला मागील वर्षी अनुदानापोटी १६८.९५ कोटी अपेक्षित धरण्यात आले होते. यंदाच्या अर्थसंकल्पात २४६. ४५ कोटींची वाढ केली आहे.

उल्हासनगर महापालिका २०२४-२५ चे ९७७ कोटी ६४ लाखाचा मूळ अर्थसंकल्प सुधारीत करुन आरंभीच्या शिल्लकेसह २०२५-२६ च्या आरंभिच्या शिल्लकेसह ९८८. ७२ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पाणीपट्टी करवाढ दर्शविणारा काटकसरीचा अर्थसंकल्प, महुसली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न, पर्यावरणपूरक उपाययोजना, महापालिकेची नवीन इमारत, महापौर व आयुक्त निवास, गोलमैदान व बोटक्लब विकास, नवीन टावून हॉल, वाल्मिकीनगर, उल्हास नदी घाट, महापालिका शाळा बांधणी, दिव्यांगासाठी कल्याणकारी योजना, प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता, महापालिका कारभार संगणकीकरण व कार्यक्षमतावर भर, पाणी स्रोत योजना, वृक्षगणना व वृक्षसंवर्धन आदी अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट ठरली आहेत. 

महापालिकेचे उत्पन्न आरंभीची शिल्लक ६८ लाख ८२ हजार मालमत्ता कर -१२०. ४१ कोटी, पाणीपट्टी कर - ७२. २५ कोटी एमआरटीपी अंतर्गत वसुली - ८२.१३ कोटी जीएसटी अनुदान - २८६. ५३ कोटी शासन अनुदान - २४६. ४५ कोटी इतर जमा उत्पन्न - ५९. ६५ कोटी असाधारण लेखे - ३०. १९ कोटी कर्ज - ५० कोटी असे एकूण ९८८.७२ कोटी उत्पन्न

 महापालिका खर्च वेतन, निवृत्ती व भत्ते - २२५.३४ कोटी शिक्षण - ५० कोटी एमआयडीसी -५१ कोटी कर्ज परत फेड - १३.३८ कोटी वीज आकार - १३ कोटी, अन्य महसुली खर्च -२३५.६८ कोटी, भांडवली खर्च - ३६९.५८ कोटी असाधारण लेखे - ३०. १९ कोटी अखेरची शिल्लक - ५४ लाख असे एकूण ९८८.१८ लाख खर्च

 ठळक वैशिष्ट्ये १) १०० टक्के नळजोडणीवर पाणी मिटर २) स्मार्ट रस्ते, शाळा, चौक पार्किंग दिव्यांग भवन, ३) संगणीकीकारणावर भर, ऑनलाईन परवाने ४) ऑडिओ लायबरी, पार्किंग व्यवस्था ५) पर्यवरण पूरक सौर ऊर्जा, इलक्ट्रॉकल बस आदिवर भर ६) सामाजिक विभागाची निर्मिती ८) शहरात सांस्कृतिक भवन, महिला भवन

शहरातील विकास कामे एमएमआरडीएकडे शांतीनगर ते साईबाबा मंदिरापर्यंतच्या उड्डाणपूलासाठी ५४४ कोटी तर शहरातील अन्य आठ रस्त्यांसाठी ९९ कोटीची मागणी करण्यात आलेली आहे.

अमृत योजना भुयारी गटार योजना- ४१६ कोटी अमृत योजना वाढीव पाणी पुरवठा योजना- ११६ कोटी मुलभूत सेवा योजना- ५० कोटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना- १० कोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजना- ५ कोटी भाजी मार्केट - ५ कोटी नवीन टाऊन हॉल- ५ कोटी संक्रमण शिबीर व एकात्मिक घनकचरा प्रकल्प

 समाज विकास विभागाची निर्मिती महानगरपालिकेमध्ये दूर्बल व वंचीत घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी समाज विकास विभागाची निर्मीती केली जाणार असून या विभागाला पुरेसे मनुष्यबळ व निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सामाजिक दृष्ट्यादूर्बल घटकांसाठीच्या कल्याणकारी योजना- ३५.३९ कोटी अल्पसंख्याकांसाठी विकास योजना    -१.५० कोटी तृतीय पंथीयांसाठीच्या विकास योजना    -५० लक्ष

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर