- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेने उभारलेले २०० बेडचे रुग्णालय उदघाटनाअभावी धूळखात पडली असताना भाडेतत्वावरील रुग्णालयावर महापालिका दरमहा २३ लाख ६० हजाराचा खर्च करीत आहे. भाडेतत्वावरील रुग्णालयाला मुदतवाढ देऊ नये. असा ठराव स्थायी समिती सभेत मंजूर झाल्यानंतरही महापालिका भाडे देत आहे.
उल्हासनगरात कोरोनाचा लाट ओसरल्यानंतर तब्बल २३ लाख ५० हजार दरमहा भाडेतत्वावर घेतलेले खाजगी साई प्लॅटिनियंम रुग्णालय त्यांचा मूळ मालकाकडे हस्तांतरण करून महापालिका पैशाची बचत करावी, असा मत प्रवाह शहरात निर्माण झाला. यातूनच महापालिका मुदत संपण्याच्या शेवटच्या स्थायी समिती सभेत भाडेतत्वावर घेतलेल्या रुग्णालयाला मुदतवाढ नाकारण्यात आली. कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टिकोनातून गेल्या दिड वर्षांपूर्वी महापालिकेने सत्य साई प्लॅटिनियंम हे खाजगी रुग्णलाय महापालिकेने भाडेतत्वावर घेऊन ४ कोटी पेक्षा जास्त खर्च भाड्यावर केला. एवढ्या किंमतीत महापालिकेचे स्वतःचे एक नवे रुग्णालय उभे राहिले असते, अशी टिका होत आहे. दरम्यान महापालिकेने अंटेलिया रिजेन्सी येथे स्वतःचे २०० बेडचे रुग्णलाय उभे केले असून स्वतंत्रपणे ऑक्सिजन प्लाट उभारण्यात आला.
महापालिकेने उभारलेले रुग्णालय उदघाटना अभावी धूळ खात पडले. तर दुसरीकडे भाडेतत्वावर घेतलेले, मात्र गेल्या काही महिन्यांपासून एकाही रुग्णालयावर उपचार सुरू नसलेल्या प्लॅटिनियंम रुग्णालयावर दरमहा २३ लाख ५० हजार खर्च करीत आहोत. महापालिकेचे दरमहा २३ लाख रुपये वाचविण्यासाठीचे भाडेतत्वावरील रुग्णालय दरवाढीचा प्रस्ताव फेटाळल्याची प्रतिक्रिया तत्कालीन स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनी दिली. तर धूळखात पडलेले रुग्णालयाचे उदघाटन महापालिका का करीत नाही? असा प्रश्न आमदार कुमार आयलानी यांनी केला. तर महापालिका रुग्णलाय शहरवासीयाच्या सेवेत लवकर येऊ द्या. अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे माजी गटनेते भारत गंगोत्री यांनी केली आहे.
साई प्लॅटिनियम रुग्णालय सुरूच- डॉ दीपक पगारे
भविष्यात कोरोनाच्या लाटेची शक्यता व्यक्त होत असल्याने, भाडेतत्वावर घेतलेले साई प्लॅटिनियंम सध्या सुरू आहे. अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ दीपक पगारे यांनी दिली. तसेच महापालिकेने उभारलेल्या रुग्णालयाकंचे लोकार्पण लवकर होणार असल्याची माहिती वैधकीय अधिकारी डॉ पगारे यांनी दिली.