उल्हासनगर : मृत महिलेच्या नावाने सन २०१३ मध्ये बांधकाम परवाना व पूर्णत्वाचा दाखला देण्याचा प्रकार उघड होणे, महापालिका पार्किंग आरक्षित भुखंडावर १२ मजल्यांचा बांधकाम परवाना दिल्यानंतर, भूखंडावर एकाने मालकीहक्क सांगणे, रिस्कबेसच्या २ मजल्यांच्या बांधकाम परवान्यावर, ७ मजल्याचे बांधकाम उभे राहणे. आदी प्रकारांमुळे महापालिका नगररचना विभाग वादात सापडला आहे.
उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभाग नेहमी वादात राहिला असून बहुतांश नगररचनाकार लाच घेताना रंगेहात सापडून त्यांना जेलची हवा खावी लागली. तर संजीव करपे नावाचे नगररचनाकार गायब झाले. त्यांचा आद्यपही पोलिसांना शोध लागलेला नाही. कॅम्प नं-३ येथील अम्ब्रॉसिया हॉटेल जवळील भूखंड शहर विकास आराखड्यात पार्किंगसाठी आरक्षित आहे. महापालिकेला २५ टक्के विकसित जागा पार्किंगसाठी मिळणार म्हणून भूखंडावर जमीन मालक व विकासकाला १२ मजल्याचा बांधकाम परवाना जानेवारी महिन्यात नगररचनाकार विभागाने दिला. दरम्यान सदर जागेला कुंपन घालन्याच्या दिवशी एकाने पत्रकार परिषद घेऊन जागेवर मालकी हक्क सांगितल्यावर एकच खळबळ उडाली. याबाबत नगररचनाकार प्रकाश मुळे यांना संपर्क साधला असता, जागेचा हक्क सांगणाऱ्याने कागदाची पूर्तता विभागाकडे केल्यास, त्याप्रमाणे चौकशी करणार असल्याची माहिती दिली.
दुसऱ्या प्रकारात कॅम्प नं-२ परिसरात सन २०१३ मध्ये मयत महिलेच्या नावाने बांधकाम परवाना दिला असून इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन पूर्णतःचा दाखला इमारतीला दिला होता. मात्र ६ वर्षांनी एका इसमाने नगररचनाकार विभागाकडे मयत महिलेच्या नावाने बांधकाम परवाना दिल्याची तक्रार दिल्यावर, हा प्रकार उघड झाला. मयत महिलेच्या नावाने बांधकाम परवाना दिल्याची माहिती विभागाला मिळाल्यावर विभागाने शुद्धीपत्रक प्रसिद्ध केल्याची माहिती नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी दिली. तक्रारदाराने नगररचना नियमानुसार मालकी हक्काचे कागदपत्र, शहर विकास आराखडा, नकाशे, डिसी रुल्स आदी कागदपत्र दिल्यास त्याबाबत चौकशी करण्याचे संकेत नगररचनाकार मुळे यांनी दिले. तसेच याबाबत सुनावणी साठी तक्रारदार व बांधकाम विकासक व जमीनमालक यांना बोलविल्याची मुळे म्हणाले.
तर तिसऱ्या प्रकारात एका रिस्कबेस बांधकाम परवाना २ मजल्याचा असतांना ७ मजल्याच्या बांधकाम उभे राहिल्याचा प्रकार उघड झाला. बहुतांश जोखीम आधारित बांधकाम परवान्यावर बहुमजली बांधकाम होऊनही महापालिकेची काहीएक कारवाई नाही.
नगररचना विभागाचा आढावामहापालिका आयुक्त अजीज शेख यांनी नगररचनाकार विभागाचा आढावा घेणार असल्याची माहिती दिली. वादातील प्रकरणाची चौकशी करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहे.