सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका नगररचनाकार विभागात बांधकाम परवाने देण्याचे काम ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन सुरू झाल्याने, गेल्या चार महिन्यात फक्त ५ बांधकाम परवान्यांना मंजुरी दिली. ऑनलाईन बांधकाम परवान्याचा फटका महापालिका उत्पन्नावर झाल्याची प्रतिक्रिया नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी दिली असून वास्तुविशारद व बिल्डरांनी ऑफलाइन बांधकामे प्रक्रिया सुरू ठेवण्याची मागणी राज्य शासनानेकडे केली.
उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभागाने गेल्या वर्षी ५५ कोटी पेक्षा जास्त उत्पन्न बांधकाम परवान्यातून महापालिकेला मिळून दिले होते. यावर्षी विभागाला ६० कोटी उत्पन्नाचे टार्गेट देण्यात आले. तर गेल्या जून महिन्या पर्यंत विभागाने १० कोटीचे उत्पन्न मिळाले. मात्र त्यानंतर बांधकाम परवाने प्रक्रिया ऑफलाइन ऐवजी ऑनलाईन करण्यात आली. ऑनलाइन बांधकाम परवाने प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने, गेल्या ४ महिन्यात फक्त ५ बांधकाम परवान्यांना मंजुरी मिळाल्याची माहिती नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी दिली. नागपूर, लातूर, नगर, धुळे आदी महापालिका मधील बांधकाम परवाने प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला होता. असेही मुळे यांचे म्हणणे आहे.
जून पासून ज्या महापालिकेत बांधकाम परवाने देण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यातील नवीमुंबई महापालिके मध्ये-२, कल्याण महापालिकेत-५, भिवंडी-५ तर उल्हासनगर महापालिकेत ५ बांधकाम परवाने देण्यात आल्याचीही मुळे म्हणाले. शासन निर्णयानुसार बांधकाम परवाने ऑनलाईन सुरू केल्यापासून नेटच्या सर्व्हेअर व तांत्रिक कारणामुळे बांधकाम परवाने सबमिट करण्यास वेळ लागून प्रक्रिया सतत बंद पडत आहे. त्यामुळे गेल्या ४ महिन्यात ५ तर महिन्याला एकच बांधकाम परवाने मंजूर झाले. याप्रकारने महापालिका नगररचनाकार विभागाच्या उत्पन्नावर ऐन दिवाळीत प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. ऑनलाईन पद्धतीने वेळेत बांधकाम परवान्यांना मंजुरी मिळत नसल्याने, वास्तुविशारद व बांधकाम व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. शासनाने ऑनलाइन प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होत नाही. तोपर्यंत ऑफलाइन बांधकाम परवाने प्रक्रिया सुरू ठेवण्याची मागणी शहरातील वास्तुविशारद व बांधकाम व्यावसायिकांनी शासनाकडे केली. अशी माहिती मुळे यांनी दिली.
बांधकाम क्षेत्रात मंदीची शक्यता
महापालिका नगररचनाकार विभागाकडून वेळेत व लवकर बांधकाम परवाने ऑनलाईन पद्धतीने सबमिट होत नसल्याने, बांधकाम क्षेत्रात पुन्हा मंदी येण्याची भीती बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. तसेच विभागातील उत्पन्नाचा परिणाम शहर विकासावर हिण्याची शक्यता व्यक्त।करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"