उल्हासनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या व्हीपचे उल्लंघन करणा-या १० ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांच्या विनंतीवरून त्यांना महासभेत सत्ताधारी बाकावर बसण्यास महापौर लीलाबाई अशान यांनी मान्यता दिली होती. दरम्यान, या फुटीर नगरसेवकांची २४ जानेवारी रोजी कोकण विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे.उल्हासनगर पालिकेत भाजपचे बहुमत असताना महापौरपदाच्या निवडणुकीत ओमी टीम समर्थक १० नगरसेवकांनी पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करत शिवसेनेच्या अशान यांना मतदान केल्याने त्या निवडून आल्या. तर, भाजपचे जीवन इदनानी यांचा पराभव झाला. शिवसेनेला पाठिंबा देणाºया या १० नगरसेवकांच्या गटाचे प्रमुख पंचम कलानी यांनी महासभेत सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसण्याची विनंती एका अर्जाद्वारे महापौरांकडे केली होती. महापौरांनी त्यांच्या विनंतीअर्जानुसार सत्ताधारी बाकावर बसविण्याचे आदेश महापालिका सचिवांना दिल्यानंतर गेल्या महासभेपासून ओमी टीम समर्थक नगरसेवक सत्ताधारी बाकावर बसत आहेत.महापौर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असून पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करणा-या नगरसेवकांविरोधात कोकण विभागीय आयुक्तांकडे गटनेते जमनू पुरस्वानी यांनी याचिका दाखल करून नगरसेवकपद रद्द करण्याची व सहा वर्षे निवडणूक लढण्यावर बंदी घालण्याची मागणी केली. कोकण विभागीय आयुक्तांनी दखल घेत ओमी समर्थक नगरसेवकांना नोटिसा पाठवून २४ जानेवारीला सुनावणी ठेवण्यात आली आहे. पुरस्वानी यांच्या मतानुसार नगरसेवकपदाबाबत कोकण आयुक्त निर्णय घेणार असून नगरसेवकपद रद्द होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तर, ओमी कलानी यांनी नगरसेवकांच्या पदाला धक्का लागणार नसल्याची प्रतिक्रिया दिली.साई पक्षाच्या विलीनीकरणाने भाजपची ताकद वाढलीमहापालिकेत भाजपचे एकूण ३२ नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये ओमी समर्थक नगरसेवकांचा समावेश होता. महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी साई पक्षाचे विलीनीकरण झाल्याने महापालिकेत भाजपचे संख्याबळ ४२ वर गेले होते. तर, बहुमतासाठी ४० नगरसेवकांची आवश्यकता आहे.
उल्हासनगर पालिका : व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या नगरसेवकांची सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 12:58 AM