शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

उल्हासनगर पालिका : महापौरपदाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 3:19 AM

पावसाळी अधिवेशनंतर महापौरपदाचा निर्णय घेण्याचे संकेत एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दबावतंत्राचा वापर करत साई पक्षासह रिपाइं व राष्ट्रवादी पक्ष सोबत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महापौरपदाचा प्रश्न लटकणार असे बोलले जात आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर : पावसाळी अधिवेशनंतर महापौरपदाचा निर्णय घेण्याचे संकेत एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दबावतंत्राचा वापर करत साई पक्षासह रिपाइं व राष्ट्रवादी पक्ष सोबत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महापौरपदाचा प्रश्न लटकणार असे बोलले जात आहे.मीना आयलानी यांच्या महापौरपदाला पाच जुलैला सव्वावर्ष होताच ओमी टीमने भाजपातील निष्ठांवत गटाला सोबत घेवून गेल्या आठवडयात नागपूर गाठले. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेवून महापौरपदाची आठवण करून दिली. पावसाळी अधिवेशनानंतर दिलेला शब्द पूर्ण करणार अशी ग्वाही या निष्ठावंत गटाला दिल्याचे समजते.मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला आमदार ज्योती कलानी, नरेंद्र पवार, सभागृहनेते जमनुदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा, प्रदीप रामचंदानी यांच्यासह ओमी टीमचे विश्वासू राजेश वधारिया आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुरस्वानी यांनी पत्रकार परिषद घेत मीना आयलानी मुख्यमंत्री व वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार जुलैच्या अखेर महापौरपदाचा राजीनामा देणार असे जाहीर करून टाकले. त्याचवेळी आयलानी, महापौरांनी राजीनामा देण्याबाबत मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिले नसल्याचे सांगितले. यामुळे भाजपातील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आला आहे. मूळात आयलानी यांची कलानी यांना सत्तेत घेऊ नये अशीच पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. सभागृह नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत मला ठाऊक नसल्याचे सांगत आयलानी यांनी निष्ठावंत गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. यातून पक्षात आलबेल नाही हे सिद्ध झाले.ओमी विरोधकांची मोट बांधणारशहर विकासाबाबत कुमार आयलानी, महापौर आयलानी यांनी ओमी टीम व भाजपातील निष्ठावंत गटाला डावलून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत उपमहापौर जीवन इदनानी, रिपाइंचे गटनेते भगवान भालेराव, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री सोबत होते. पालिकेत साई पक्षाचे १२, रिपाइं गटाचे ३ व राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आहेत. आयलानी, इदनानी, भालेराव व गंगोत्री ओमी कलानी टीमचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.विकासकामांबाबत महासभामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी शहर विकासासाठी ३५० कोटीचा निधी देण्याचे संकेत दिले होते. या निधीतून शहरातील रस्ते, पाणी टंचाई, वृक्षारोपण आदी कामे होणार आहेत. याबाबत १८ व २० जुलैला महासभा व विशेष महासभा होणार असून यासंदर्भात गुरूवारी महापौरांच्या दालनात बैठक झाली.ओमी टीमला पदापासून ठेवले दूरउल्हासनगर पालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर येथील पदे भाजपाने स्वत:कडे तसेच साई पक्षाकडे ठेवली. सत्तेत सहभागी असूनही ओमी टीमला पदापासून कायम दूर ठेवले. अगदी प्रभाग समिती सदस्य, सभापतीपदही टीमला मिळणार नाही याची पुरेपूर काळजी भाजपाने घेतली होती. त्यामुळे एकेकाळी कलानी यांचे वर्चस्व असलेल्या पालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपाला यश आले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरnewsबातम्या