उल्हासनगर : पोलीस परिमंडळ क्षेत्रातील विधानसभा निवडणूक शांततामय व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांनी १० जणांवर हद्दपारीची कारवाई केली. याशिवाय इतर काही जणांवर हद्दपारीची प्रक्रीया सुरू असून, ४०० पेक्षा जास्त परवानाधारकांची शस्त्रे जमा करण्यात आल्याची माहिती शेवाळे यांनीदिली आहे.उल्हासनगर पोलीस परिमंडळ अंतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर शहराचा समावेश आहे. परिमंडळ क्षेत्रातील विधानसभा निवडणुका खुल्या वातावरणात होण्यासाठी शेवाळे यांनी संबंधित पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना सराईत गुन्हेगारांची यादी मागविली होती. त्यानुसार अक्षर खरात, बबलू वाघे, अक्षय जाधव, जिलाबी दुबे, भातूसिंग राठोड, विकास किर, संदीप पठारिया, श्रीकांत विजय सिंग, संजू उर्फ भोलेनाथ गुप्ता अशा दहा जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. यापूर्वी ५० जणांवर हद्दपारीची कारवाई केलेली असून त्यांची हद्दपारीची मुदत अद्याप संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.पोलीस परिमंडळाने कलम १५१ अंतर्गत १० पेक्षा जास्त जणांवर कारवाई केली असून, रेकॉर्डवरील गुन्हेगांराना दररोज संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक केले आहे.याशिवाय गेल्या आठवड्यात गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून गावठी दारूसह साहित्य ताब्यात घेतले. तसेच निवडणुकीदरम्यान काही संशयितांवर पाळत ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहे. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी दक्षता घेण्यातयेत आहे.यापूर्वी हद्दपारीची कारवाई केलेल्या ५० जणांची व आता हद्दपारीची कारवाई केलेल्या १० जणांची नावे सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार आहेत.पोलीस परिमंडळ क्षेत्रात हद्दपारीचे गुन्हेगार दिसल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन शेवाळे यांनी नागरिकांना यावेळीकेले.्नराजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्याची नावे?शेवाळे यांनी १० जणांवर हद्दपारीची कारवाई करून, रेकॉर्डवरील गुन्हेंगारावर हद्दपारीची कारवाई यापुढेही सुरूच ठेवण्याचे संकेत दिले.विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असलेले अनेक जण राजकीय पक्षांमध्ये सक्रीय आहेत.हद्दपारांच्या यादीत त्यांचीही नावे असल्याची चर्चा सुरू आहे.
उल्हासनगर पोलीस परिमंडळातून १० जणांवर हद्दपारीची कारवाई, शेकडो शस्त्रे जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 1:44 AM