- सदानंद नाईक उल्हासनगर - वीजबिल वाढ, वारंवार विधुत पुरवठा खंडित होणे आदींच्या निषेधार्थ शहर काँग्रेसने आकाश कॉलनी येथील महावितरण कार्यालयावर शुक्रवारी दुपारी आक्रोश मोर्चा काढला. शिष्टमंडळाने महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीपकुमार कुंभारे यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले आहे.
उल्हासनगरकाँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला व नागरिकांनी बीजबिल वाढ, विधुत पुरवठा वारंवार खंडित होणे, सबस्टेशनचे अर्धवट काम आदींच्या निषेधार्थ रोहित साळवे यांनी आकाश कॉलनी येथील महावितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला आहे. मोर्चातील महिला व नागरिकांनी महायुती सरकार व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या निषेधार्थ घोषणा देत विधुत अभियंता कुंभारे यांच्या समोर समस्यांचा पाडा वाचला. यावेळी शिष्टमंडळाने अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीपकुमार बाबुराव कुंभरे, विधुत अधिकारी प्रविण चकोले, जितेंद्र फुलपगारे यांच्या सोबत चर्चा करुण जनतेच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला.
आक्रोश मोर्चात माजी नगरसेविका अंजलीताई साळवे, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा महाकाळे, सीमा आहुजा, सिंधुताई रामटेके, सेवादल अध्यक्ष शंकर आहुजा, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, नाणीक आहुजा, महेश आहुजा, महादेव शेलार, राजेश फक्के, दीपक सोनोने, आसाराम टाक, नारायण गेमनानी, रोहित ओहाळ, शैलेंद्र रुपेकर, विशाल सोनवणे, संतोष मिडे, आबा साठे, आबा पागारे, मनोहर मनुजा, नाना अहिरे, आदीसह शेकडो महिला व नागरिक मोर्चात सहभागी झाले होते