शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

उल्हासनगरवासीयांवर ३५ कोटींच्या करवाढीची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 3:30 AM

महापालिका प्रशासनाने ३५ कोटी रुपयांचा कचरा व घनकचरा व्यवस्थापनकराचा प्रस्ताव महासभेत आणल्याने, नागरिकांच्या डोक्यावर करवाढीची टांगती तलवार आहे.

- सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिका प्रशासनाने ३५ कोटी रुपयांचा कचरा व घनकचरा व्यवस्थापनकराचा प्रस्ताव महासभेत आणल्याने, नागरिकांच्या डोक्यावर करवाढीची टांगती तलवार आहे. घनकचरा व्यवस्थापनकराला सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी विरोधाची भूमिका स्पष्ट केली असून व्यापारी संघटनेने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.उल्हासनगरातील कचरा उचलण्यावर वर्षाकाठी २० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जातो. सफाई कर्मचाºयांचा पगार आणि इतर खर्चही भरपूर असल्याने शासन धोरणानुसार स्वच्छता अभियानांतर्गत कचरा व्यवस्थापनकर लागू करण्याचा प्रस्ताव महासभेत आणण्यात आला. महापालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापनापोटी ३५ कोटी रुपयांची करवाढ निश्चित केली. तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कचरा व्यवस्थापन करवाढीचा प्रस्ताव यापूर्वीही महासभेत आणला होता. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमताने प्रस्ताव फेटाळला होता. शून्यकचरा संकल्पनेवर कचºयाचा ठेका कोणार्क कंपनीला दिला असतानाही कचºयाचे ढीग शहरात आहेत. कोणार्क कंपनी अटी आणि शर्तींचे सर्रास उल्लंघन करत असून कंपनीवर कारवाई केली जात नसल्याने पालिकेवर टीका होत आहे.शहर हगणदारीमुक्त व स्वच्छ होण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनीही केला होता. मध्यंतरी, सहा कोटी रुपयांच्या निधीतून शहरात कचºयाचे डबे पुरवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. सार्वजनिक शौचालयाच्या साफसफाईसाठी वर्षाला पाच कोटींचा ठेका देण्याचेही ठरले होते. मात्र, त्यावरही टीका झाल्याने दोन्ही प्रस्ताव रखडले. शहरातील चौक, मुख्य रस्ते, मैदान आदी ठिकाणी ओला व सुका कचरा संकलनासाठी ठेवलेल्या कचरापेट्यांची काही महिन्यांतच दुरवस्था झाली आहे.>व्यापाºयांचा विरोध, रस्त्यांवर उतरण्याचे संकेत : शहरात कचºयाचे ढीग असताना कचरा व्यवस्थापन करवाढ कशाची, असा प्रश्न व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश तेजवानी यांनी केला. कचरा व्यवस्थापन करवाढीला विरोध करून यासाठी व्यापारी रस्त्यांवर उतरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर