सदानंद नाईक, उल्हासनगर: शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह १५ जनावर आदिवासी महिलेची जमीन हडप करणे, खंडणी, फसवणूक अश्या गुन्ह्याची नोंद मध्यवर्ती पोलीस ठाण्यात झाल्यावर, त्यांची सलग १४ तास चौकशी करून सोडून देण्यात आले. त्यानंतर चौधरी हे शिंदे गटात वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले असून त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी भेटायला बोलविल्याची प्रतिक्रिया देऊन पक्ष प्रवेशाचे संकेत दिले.
उल्हासनगर शिवसेनेचे गेल्या १५ वर्षांपासून शहरप्रमुख राहिलेले राजेंद्र चौधरी हे शिवसेनेत दोन गट झाल्यावर ते ठाकरे गटा सोबत राहिले. मात्र गुरवारी रात्री ९ वाजता राजेंद्र चौधरी यांना मध्यवर्ती पोलिसांनी ताब्यात घेऊन दुसऱ्या दिवसी शुक्रवारी दुपार पर्यंत चौकशी केली. चौधरी यांच्या अटकेची माहिती शिवसैनिकांना समजल्यावर शेकडो शिवसैनिकानी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून घोषणाबाजी केली. या दरम्यान पोलिसांनी चौधरी यांना कोणालाही भेटू देण्यात आले नाही. शुक्रवारी दुपारी चौधरी यांना गंभीर गुन्हे दाखल होऊनही अटक न करता त्यांना पोलिसांनी सोडल्याने सर्वांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. चौधरी यांनी शिंदे गटात जाण्यास संमती दिल्यानेच, त्यांना पोलिसांनी सोडले असावे. अशी चर्चा शहरात रंगली.
महाविकास आघाडीच्या मोर्चात शहरप्रमुख राजेंद्र चौधरी हे उपस्थितीत राहू शकले नाही. त्यामुळे चौधरी यांच्या भोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले. चौधरी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी शिंदे गटात प्रवेश घेणार या बाबत बोलण्यास नकार दिला. मात्र शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा व भेटीसाठी बोलविल्याची प्रतिक्रिया दिली. चौधरी हे शिंदे गटात गेल्यास शहरात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. चौधरी हे शिंदे गटात येण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना राजकीय दबावाखाली आणल्याचेही बोलले जात आहे. राजेंद्र चौधरी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यांना शिंदे गट कल्याण जिल्हाप्रमुख पद देण्याची शक्यता व्यक्त होत आहे आहे