शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उल्हासनगरमध्ये अजूनही ३५० स्वयंसेवक मानधनाविना; जीव धोक्यात घालून केलं सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 11:46 PM

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सरकारकडून आलेले मानधन स्वयंसेवकांना मिळाले. मात्र, महापालिकेकडून मिळणारे मानधन अद्याप मिळालेले नाही, अशी तक्रार निकम यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.

सदानंद नाईकउल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत ३५० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून काम केले. मात्र, महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे मानधन अद्याप दिले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येला ब्रेक लागला असून महापालिकेचा आरोग्य विभाग व महापौर लीलाबाई अशान यांना श्रेय जाते. उपमहापौर भगवान भालेराव, सभागृह नेते भरत गंगोत्री, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, अरुण अशान, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे, डॉ. अनिता सपकाळे आदींच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत नगरसेवकांनी प्रत्येक प्रभागात दिलेल्या स्वयंसेवकांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. तसेच संशयित कोरोना रुग्णांची नोंद करून वेळीच उपचार केले. त्यामुळेच कोरोना रुग्णांना ब्रेक लागल्याची प्रतिक्रिया डॉ. सपकाळे यांनी दिली.

शहरात ही मोहीम यशस्वीपणे राबविणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत ३५० पेक्षा जास्त स्वयंसेवक दुर्लक्षित राहिल्याचा आरोप युवा सेनेचे रवी निकम यांनी केला आहे.  स्वयंसेवकांनी सलग २५ दिवस स्वतःसह कुटुंबाचा जीव धोक्यात घालून काम केले. त्याबदल्यात त्यांना सरकारकडून दररोज १०० व महापालिका १०० असे एकूण २०० रुपये मानधन देण्याचे ठरले होते. सरकारकडून आलेले मानधन स्वयंसेवकांना मिळाले. मात्र, महापालिकेकडून मिळणारे मानधन अद्याप मिळालेले नाही, अशी तक्रार निकम यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.

निकम यांनी मानधनासाठी शहरप्रमुख चौधरी व महापौरांकडे दाद मागितल्यावर मानधन देण्याचे आश्वासन मिळाले. काेराेनाच्या काळात शहरात रुग्णसंख्या वाढल्यामुळे पालिका प्रशासन चिंतेत पडले हाेते. मात्र, आयुक्त डाॅ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली आराेग्य व्यवस्थेची सुधारणा करुन  रुग्णसंख्या कमी करण्यात अखेर पालिका प्रशासनाला यश आले. पालिकेकडून वारंवार केल्या जाणाऱ्या आवाहनाला शहरातील नागरिक, व्यापारी यांनी चांगला पाठिंबा दिल्यामुळे  रुग्णवाढीचा दर खाली आला. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास काेराेनाचा प्रार्दुभाव नक्कीच वाढणार नाही असा विश्वास पालिका प्रशासनाने या निमित्ताने व्यक्त केला आहे.

मानधन लवकरच मिळेल‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत ३५० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. सरकारकडून आलेल्या निधीतून त्यांना पहिल्या टप्प्याचे मानधन दिले. लवकरच पालिकेच्या वतीने देण्यात येणारे मानधन दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या