उल्हासनगर : उल्हासनगरात आज नवे २५१ कोरोना रुग्ण आढळून आली असून एकूण रुग्णाची संख्या २८१० झाली. तर दोन रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत १४६२ रुग्ण कोरोना मुक्त झाले तर १२९१ जनावर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ सुहास मोहनालकर यांनी दिली.
उल्हासनगरात रविवारी तब्बल २५१ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णाची संख्या २८१० झाली. त्यापैकी आज पर्यंत १४६२ जण कोरोना मुक्त झाले. तर १२९१ रुग्णावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोन जणाचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूची संख्या ५७ झाली. शहरातील कॅम्प नं -१ मध्ये - ४९, कॅम्प नं-२ मध्ये -३२, कॅम्प नं -३ मध्ये -४८, कॅम्प नं -४ मध्ये -७७ तर कॅम्प नं -५ मध्ये ४५ असे एकूण २५१ नवे रुग्ण आढळून आले. शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत सतत वाढ होत असून शहरातील शांतीनगर, कुर्ला कॅम्प, सुभाष टेकडीसह झोपडपट्टीचे अनेक भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत.