उल्हासनगर : कॅम्प नं-२ येथील महापालिका भाजी मंडई रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून २० पेक्षा जास्त दुकाने जमीनदोस्त केले. रस्ता रुंदीकारणामुळे वाहतूक कोंडीची समस्या निकाली निघणार असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
उल्हासनगरातील बहुतांश रस्ते अरुंद असल्याने, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. दरम्यान महापालिकेने एकून ६ रस्ता बांधण्याला मंजुरी दिली असून रस्ता बांधण्यापूर्वी रस्त्याचे रुंदीकरण्यात येणार आहे. यामध्ये शेकडो दुकानावर कारवाई होण्याचे संकेत महापालिका अधिकाऱ्याने दिले. तसेच कॅम्प नं-२ येथील भाजी मंडई कडून मुख्य रस्त्यावर जाणाऱ्या मंडई रस्त्याचे रुंदीकरण्यात आले. रुंदीकरण्यात २० पेक्षा जास्त दुकानावर कारवाई झाली. मात्र पाडकाम कारवाई केलेले गाळे पुन्हा उभी राहू नये. यासाठी पालिका अधिकाऱ्यांना सतर्क राहावे लागणार आहे.
महापालिकेचे सहायक आयुक्त व अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी, सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्या पथकाने रस्ता रुंदीकरण केले. भाजी मंडई रस्त्या प्रमाणे इतर रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी शहरातून होत आहे.