- सदानंद नाईक उल्हासनगर - रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहर वाहतूक विभागाच्या वतीने शनिवारी दुपारी गोलमैदान परिसरातून जनजागृती शालेय मुलांची पदयात्रा काढण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी रस्ते वाहतुकी बाबत माहिती दिली आहे.
उल्हासनगर वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत विविध अभियान राबवून रस्ता सुरक्षा बाबत नागरिकांना माहिती दिली. रस्ते अपघात व सुरक्षेबाबत नागरिकांत जनजागृती करण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम गेल्या आठवड्यापासून राबविली जात आहे. तसेच शनिवारी दुपारी जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत महाराष्ट्र मित्र मंडळ शाळेच्या मुलांनी सहभाग घेऊन वाहतूक सुरक्षे बाबत मुलांनी घोषणा दिल्या. तसेच रस्ते अपघातात सर्वाधिक जीव जात असल्याने, नागरिकांत रस्ते सुरक्षाबाबत माहिती दिली जाते. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी दिली आहे. पदयात्रेत वाहतूक पोलीस व वाहतूक वॉर्डन सहभागी झाले होते.