उल्हासनगर : उल्हासनगर हागणदारी मुक्त करण्यासाठी एमएमआरडीएसह पालिकेच्या ५५० सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरूस्ती केली. तर नागरिकांना २४६१ वैयक्तिक स्वच्छतागृहांसह १० सामूहिक स्वच्छतागृह बांधून दिली. तसेच तीन फिरती स्वच्छतागृह उपलब्ध केल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी दिली. स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत राज्यस्तीय समितीचे पथक पाहणीसाठी पुढील आठवडयात येणार आहेत.उल्हासनगर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी विविध उपक्रम राबवले. प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षक, मुकादम व कर्मचºयांचे आयुक्तांनी गुड मॉर्निंग पथक स्थापन करून उघडयावर प्रातर्विधीसाठी जाणाºया नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. ज्या नागरिकांकडे जागा उपलब्ध आहे त्यांना वैयक्तिक स्वच्छतागृह बांधून दिली.ज्यांच्याकडे जागा नाही त्यांना सार्वजनिक स्वच्छतागृह वापरण्याचा सल्ला दिला. तसेच परिसरात स्वच्छतागृहाची दुरूस्ती हाती घेऊन वीज व पाणीपुरवठा सुरू केला. उघडयावर प्रातर्विधीसाठी जाणाºयांची संख्या कमी होऊन तीन ठिकाणी फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले. मात्र मागीलवेळी राज्यस्तरीय समितीच्या दौºयात काही सार्वजनिक व पालिका शाळेच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था उघड झाल्यावर शहर हागणदारी मुक्त होऊ शकले नाही.शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी पालिका आयुक्तांसह उपायुक्त संतोष देहरकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार यांच्यासह सहायक आयुक्त गणेश शिंपी, मनिष हिवरे, अलका पवार, स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांनी प्रयत्न केले.आयुक्तांनी एमएमआरडीएने बांधलेले स्वच्छतागृह ताब्यात घेऊन त्यांच्यासह तब्बल ५५० स्वच्छतागृहांची दुरूस्ती व डागडुजी सुरू केली. तसेच वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्याचे सरकारचे लक्ष्य पूर्ण केले. या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसºया आठवडयात पुन्हा राज्यस्तरीय समितीचे पथक पाहणीसाठी येत आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
उल्हासनगर होणार हगणदारीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 1:50 AM