उल्हासनगर - कॅम्प नं-३ टाऊन हॉल मध्ये रविवारी उल्हासनगर मेडिकल असोसिएशनचे उमकॉन-२३ कार्यक्रमाचे उदघाटन आमदार कुमार आयलानी व असोसिएशनचे अध्यक्ष डॉ दीपक जुमानी यांच्या हस्ते संपन्न झाले. मुंबईच्या वरिष्ठ डॉक्टरांकडून वैधकीय क्षेत्रातील घडामोडी बाबत माहिती देऊन नविन संशोधना बाबत माहिती दिली.
उल्हासनगर मेडिकल असोसिएशनच्या वतीने UMACON-२३ चे आयोजन रविवारी टाऊन हॉल मध्ये आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उदघाटन आमदार कुमार आयलानी व मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ दीपक जुमानी यांच्या हस्ते झाले. प्रत्येक दोन वर्षांनी होत असलेल्या असोसिएशनच्या कार्यक्रमाला शहरातील शेकडो डॉक्टरांनी हजेरी लावली. यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करून गोरगरीब व गरजू नागरिकांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा असल्याचे सांगितले. यावेळी डॉ नरेंद्र पंजवानी, डॉ राजेश वी ठाकूर, डॉ नंदा सावंत, डॉ भारत जग्यासी, डॉ हरेश गोंदिया, डॉ हरेश सेहदादपुरी, डॉ मुकुल वानी, डॉ प्रकाश कुरानी, डॉ राजा रिजवानी, प्रकाश नाथानी, डॉ राजू उत्तमानी, डॉ हरेश जग्यासी आदीसह शेकडो डॉक्टर उपस्थित होते.