शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

उल्हासनगरात महाराष्ट्र दिनावर अघोषित बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 3:34 AM

महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, अतिरिक्त आयुक्त विजय कंठे यांच्यासह अन्य अधिकारी व लोकप्रतिनिधींनी दांडी मारल्याने

उल्हासनगर : महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, अतिरिक्त आयुक्त विजय कंठे यांच्यासह अन्य अधिकारी व लोकप्रतिनिधींनी दांडी मारल्याने, शहरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. महत्त्वाच्या व्यक्तींनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने अखेर जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना उल्हासनगरात मात्र लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचा निरुत्साह ठळकपणे जाणवला. महापालिका प्रांगणातील ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा महापौरांच्या हस्ते होतो, अशी प्रथा आहे. मात्र महापौर, आयुक्त, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त अन्य अधिकारी व सर्व नगरसेवकांनी अघोषित बहिष्कार टाकल्याने ध्वजारोहणाची जबाबदारी महापालिका जनसंपर्क अधिकारी भदाणे यांच्यावर आली. यावेळी महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, सहायक आयुक्त गणेश शिंपी, शहर अभियंता महेश शितलानी, यशवंत सगळे, बाळू नेटके आदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी समिती सभापती जया माखिजा, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, गटनेता रमेश चव्हाण, विशेष व प्रभाग समितीचे सभापती, विविध पक्षांचे नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त विजया कंठे, उपायुक्त संतोष देहरकर, सहायक आयुक्त, विविध विभागांचे प्रमुख, मुख्य लेखापरीक्षक यांच्यासह अन्य अधिकारी व लोकप्रतिनिधींना महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाचा विसर कसा पडला, अशी टीका होत आहे.