उल्हासनगर - राज्यभर व देशात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना महापालिका ध्वजारोहणच्या कार्यक्रमावर महापौर, उपमहापौर, विरोधीपक्षनेता, स्थायी समिती सभापती, विविध पक्षाचे नगरसेवक , अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध विभागाचे विभाग प्रमुखांनी दिंडी मारली, नियमानुसार महापौराचा हस्ते ध्वजारोहण होते. मात्र शहराच्या इतिहासात प्रथमच सर्वच जण गैहजर होते. एकप्रकारे त्यांनी महाराष्ट्र दिनावर अघोषित बहिष्कार टाकला की काय? असा प्रश्न शहरवासीयांचे पडला.महापालिकेत ध्वजारोहण कार्यक्रमाला जनसंपर्क अधिकारी भदाणे, पालिका सचिव कुलकर्णी, शहर अभियंता सितलानी, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, यशवंत सगळे आदी बोटावर मोजण्या इतपत अधिकारी उपस्थिती होते, महापौर, उपमहापौर, विरोधीपक्ष नेता, स्थायी समिती सभापती, प्रभाग व विशेष समिती सभापतीसह एकही नगरसेवक उपस्थित नसल्याने, अखेर जनसंपर्क अधिकारी भदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महापौरासह पालिका अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दिनी दांडी मारल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत असून कार्यवाईची मागणी होत आहे.
उल्हासनगरात महापौर आणि नगरसेवकांचा महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमावर अघोषित बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 9:19 PM