शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

‘क्लस्टर’द्वारे अनधिकृत दिवाही होणार आता अधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 11:41 PM

प्रमोद पाटील यांची लगीनघाई । महापालिका आयुक्तांची घेतली भेट, आठ दिवसांत सर्वेक्षण करण्याचे दिले आदेश

ठाणे : अनधिकृत बांधकामांसाठी कुख्यात असलेले आणि याच बांधकामांमुळे पावसाळ्यात तुंबलेल्या दिवावासीयांना अद्यापही पावसाळ्यातील नुकसानभरपाई मिळालेली नाही. तसा प्रयत्न वा त्यासाठी पाठपुरावा करण्यात ठाण्यातील एकाही नेत्याने स्वारस्य दाखविलेले नाही. मात्र,आता बिल्डर आणि राजकिय नेत्यांना विशेष रस असलेली मलईदार क्लस्टर योजना दिव्यातही राबविण्यात येणार आहे. यामुळे अनधिकृत असलेले दिवा एकीकडे अधिकृत होण्यास मदत होणार असून दुसरीकडे प्रशासन,बिल्डरांसह राजकिय पुढाऱ्यांचेही चांगभले होणार आहे.कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी यासाठी पुढाकार घेऊन शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन दिव्यात क्लस्टर योजना राबवण्याची मागणी केली.दिव्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असल्याने क्लस्टर राबवल्यास दिव्यातील नागरिकांना अधिकृत घरे मिळून मालमत्ताकराच्या माध्यमातून पालिकेचे उत्पन्नदेखील वाढणार असल्याचा दावा लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. येथील बराचसा भाग हा सीआरझेडमध्ये असल्याने येत्या ८ दिवसांत सर्व्हे करून कोणत्या भागात क्लस्टर व्यवहार्य होऊ शकते, याची चाचपणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.गुरुवारी ठाण्यातील किसननगर भागात क्लस्टरचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर, घाणेकर नाट्यगृहात एमएमआरए रिजनमध्येही क्लस्टर राबविण्याबरोबरच त्याचे वेगळे प्राधिकरण करण्याचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानुसार, पाटील यांनी ही मागणी केली. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या ४४ यूआरपीमध्ये दिव्याच्या क्लस्टरचा समावेश असला, तरी सुरुवातीला केवळ पालकमंत्र्यांच्या भागातील क्लस्टरचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतरच आता दिव्याच्या क्लस्टर योजनेच्या हालचालींना वेग आला आहे.त्रस्त रहिवाशांची होणार सोय : पावसाळ्यात दिव्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यासाठी येथील त्रस्त रहिवाशांना सुरक्षित निवारा देण्याची आवश्यकता असल्याचे पाटील यांनी सांगितले. नागरी सुविधांची वानवा असून क्लस्टर योजना राबवल्यास दिवा भागासाठी नागरी सुविधादेखील मुबलक प्रमाणात मिळतील.विशेष म्हणजे मालमत्ताकर भरण्यामध्ये दिवा सर्र्वात पिछाडीवर असल्याने क्लस्टरच्या माध्यमातून दिव्यात मोठ्या प्रमाणात घरे निर्माण झाल्यास या कराच्या माध्यमातून पालिकेच्या उत्पनातदेखील भर पडणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.दिवा यूआरपी २०१ हेक्टरचा : ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या ४४ यूआरपीमधील दिवा हे सर्वात मोठे यूआरपी असून २०१ हेक्टर परिसर यूआरपीमध्ये येतो. मात्र, मोठ्या प्रमाणात सीआरझेडचा परिसर असल्याने विकासासाठी केवळ १४ टक्के क्षेत्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वात मोठी क्लस्टर योजना असूनही ती किती व्यवहार्य आहे, हे सर्व्हेनंतरच स्पष्ट होईल.