शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

पदे रद्द होण्यामागे बेफिकिरी? जिल्हाधिकारी, आयुक्तांवर लोकप्रतिनिधींचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 5:31 AM

आरक्षित जागांवर निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालास संबंधित महापालिकांचे आयुक्त व जिल्हाधिकारी हेही तेवढेच

नारायण जाधव ठाणे : आरक्षित जागांवर निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालास संबंधित महापालिकांचे आयुक्त व जिल्हाधिकारी हेही तेवढेच जबाबदार आहेत. नगरसेवक, जि.प. व पंचायत समिती सदस्यांना हे प्रमाणपत्र मिळावे, याकरिता आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी पाठपुरावा करावा, असे आदेश यापूर्वी दिले होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीबरोबरच आयुक्त व जिल्हाधिकारी यांची बेफिकिरी या निकालाच्या मुळाशी आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे कोल्हापूर महापालिकेतील २० नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. याचा फटका राज्यातील नगरपालिकांसह पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आणि महापालिकांमध्ये आरक्षित जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना बसणार आहे. मात्र, त्यास संबंधित लोकप्रतिनिधी, जातपडताळणी समिती तसेच त्यात्या महापालिकांचे आयुक्त आणि संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तेवढेच जबाबदार असल्याचे शासनाच्या याबाबतच्या आदेशावरून उघड झाले आहे. गेल्या वर्षी फेबु्रवारी महिन्यात झालेल्या १० महापालिकांसह २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षित जागांवर निवडणूक लढवणाºया उमेदवारांना दिलासा देण्यासाठी उच्च न्यायालयाने ९ डिसेंबर २०१६ रोजी एका निर्णयावर नोंदवलेल्या निरीक्षणानुसार शासनाने जानेवारी महिन्यात हे आदेश काढले.

निवडणुकांत अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या आरक्षित जागांवर निवडणूक लढवून निवडून येणाºया उमेदवारांना आपले जातप्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. ते सादर न केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. मात्र, संबंधित जातपडताळणी समितीकडून वेळेत हे प्रमाणपत्र न मिळाल्याने काही ठिकाणी संबंधिताचे सदस्यत्व रद्द झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ही अडचण लक्षात घेऊन आरक्षित जागांवर निवडून आलेल्या सदस्यांना निर्धारित मुदतीत त्यांचे जातप्रमाणपत्र मिळावे, यासाठी संबंधित महापालिकांच्या आयुक्तांसह नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयांनीही विभागीय जातप्रमाणपत्र समित्यांकडे पाठपुरावा करावा, असे म्हटले होते. या आदेशापूर्वी आपले सदस्यत्व रद्द होऊ नये, म्हणून निवडून आलेल्या सदस्यांकडूनच संबंधित विभागीय जातपडताळणी समितीकडे जातप्रमाणपत्रासाठी पाठपुरावा केला जात होता. त्यांचे एकट्याचे प्रयत्न कमी पडत असल्याने शासनाच्या नगरविकास विभागाने जिल्हाधिकारी आणि आयुक्तांवरही पाठपुराव्याची जबाबदारी सोपवणारे हे आदेश काढले होते.

काय होते ते शासन आदेशनगरपालिका, महापालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये आरक्षित जागांवर निवडून येणाºया सदस्यांच्या नावांसह त्यांचे प्रभाग, ते कोणत्या जातीचे आहेत, ते कोणत्या तारखेस निवडून आले व त्यांचे जातप्रमाणपत्र सादर करण्याची मुदत कधी संपत आहे, याची माहिती सर्व तपशिलासह वेळेत विभागीय जातपडताळणी समितीकडे पाठवून त्याचा तातडीने पाठपुरावा करावा, असे आदेश जिल्हाधिकारी आणि महापालिकांच्या आयुक्तांना शासनाने दिले होते. यासाठी संबंधित सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभाग, आदिवासी विकास विभागाने संबंधित विभागीय जातपडताळणी समित्यांना अशा सदस्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत देण्याचे बंधन घालावे, असे नगरविकास विभागाने त्यात म्हटले होते.हे प्रभाग आरक्षितराज्यातील महापालिकांमध्ये अनुसूचित जातीचे १७२, जिल्हा परिषदेत १८९, तर पंचायत समितीत ३८६ प्रभाग आहेत. तसेच महापालिकांमध्ये अनुसूचित जमातींचे ३८, जिल्हा परिषदेत १५६ आणि पंचायत समितीत २९३ प्रभाग आरक्षित आहेत. 

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारण