टिटवाळा - कोकण किणार पट्टीही ऐतिहासिक वारसा लाभलेली भाग. या इतिहासाचा वारसा कायम तेवत रहाणे तितकेच म्हत्वाचे आहे. याच धर्तीवर शनिवारी कोकण इतिहास परिषदेचे ९वे राष्ट्रीय अधिवेशन कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील जीवनदीप महाविद्यालयात मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. यावेळी आपल्या परखड व स्पष्ट भाषणातूण आप्पा परब यांनी इतिहास समजून घेण्यासाठी तो मनात रुजविणे गरजेचे आहे. तसेच इतिसासाची खोटी माहीती काही कवी व लेखक समाजाला देणायाचा प्रयत्न करताता त्यांना माझी हात जोडून विनंती आहे. खरा इतिहास समाजाला सांगा. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय जीवनात आपण कोणत्या क्षेत्रात आहोत याचा विचार न करता इतिहासाचा अभ्यास केला तर नक्कीच तुमचं ध्येय निश्चिंत करू शकता असे मत आपल्या मार्गदर्शन भाषणातून व्यक्त केले. यावेळी मंचावर कोकण शिक्षण मतदारसंघाचे माजी आमदार रामनाथ मोते सर, कल्याण उपविभागीय अधिकारी नितीन महाजन, टिळक महाराष्ट्र विद्यालय, पुणे याच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ.मंजिरी भालेराव (पुणे), जेष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब, प्राचार्य.डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, महाड डॉ.धनाजी गुरव, कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रवींद्र लाड, कल्याण शाखा अध्यक्ष जितेंद्र भामरे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अधिवेशनाचे अध्यक्षपद डॉ.मंजिरी भालेराव यांना देण्यात आले. यावेळी जेष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच या प्रसंगी छायाचित्रण स्पर्धा, माहितीपट सादरीकरणा व रांगोळी स्पर्धेत भाग घेतलेल्या विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या अधिवेशनाप्रसंगी आप्पा परब यांच्या शिक्के आणि कट्यारी या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. इतिहासाच्या आधारे जाती व धर्म भेदाला वाव देऊन सध्याच्या परिस्थितीत वादाला तोंड फोडले जाते. इतिहास योग्य प्रकारे समजून घेणे गरजेचे आहे. जर काय इतिहास व्यवस्थित समजला तर कुठल्याही प्रकारची जाती व धर्म भेदाचा तिडाच निर्माण होणार नाही. असे मत यावेळी मार्गदर्शन पर भाषणातून बोलतात अधिवेशन अध्यक्षा डाॅ. मंजिरी भालेराव यांनी व्यक्त केले. इतिहास हा विषय आपल्या जिवनाला कलाटणी देणारा विषय आहे. परंतू सध्यस्थिती पहाता इतिहास हा विषय भुतकाळातच जमा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तरूणांना इतिहास हा विषय किचकट वाटत आहे. परंतू इतिहास हा विषय आपल जिवन घडविण्यासाठी योग्य विषय आहे. त्याची कास धरली तर तुम्ही जिवनात यशस्वी होण्यासाठी कधीच मागे पडणार नाहीत. इतिहास जोपासा, तो समजून घ्या व आपले ध्येय निश्चित करून ते गाठण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारचे वक्तव्य यावेळी कल्याण उपविभागीय अधिकारी नितीन महाजन यांनी उपस्थित विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना उद्देशून केले. या अधिवेशनात ऐतिहासिक किल्ल्याचे प्रदर्शन व माहिती पट दाखविण्यात आले.याचा लाभ कल्याण तालुक्यातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला.प्राचीन,मध्ययुगीन व अर्वाचिन इतिहासाची माहिती इतिहास संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली दाखविण्यात आली.तसेच या अधिवेशना प्रसंगी इतिहासाची माहिती व विविध गड किल्याचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांचे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते,सदर ची पुस्तके खरेदी करण्यासाठी मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. सदरचे पहिल्या दिवशीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी जीवनदीप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र घोडविंदे सर, प्रा. के.बी.कोरे,उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे,इतिहास विभाग प्रमुख प्रा.लक्ष्मण भोईर, प्रा.राजाराम कापडी व प्रा.श्रावण केळकर यांनी विशेष मेहनत घेतली.
इतिहास समजून घेण्यासाठी तो मनात रुजविणे गरजेचे आहे- आप्पा परब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 8:47 PM