ठाणे: डबल इंजिनचे सरकार राज्यात बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करीत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नसल्याने केवळ आरोप करण्याचेच ते काम करीत आहेत. परंतु लोकसभेच्या निवडणुकीनंतर याच विरोधकांवर बरोजगार होण्याची वेळ येईल अशी टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घघाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते, त्यांच्यासमेवत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभाग लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, सदाभाऊ खोत आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील बंद झालेले प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत, गडचिरोलीमधील नक्षलवाद संपल्याने आता नवनवे उद्योजक त्याठिकाणी उद्योगांसाठी येत आहेत.
त्यातून तेथील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचेही ते म्हणाले. सरकारच्या माध्यमातून शासकीय नोकरीवरील बंदी हटविण्यात आली आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून हातांना काम देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. आम्ही राम मंदिर बांधले, परंतु त्याचे राजकारण केले नसल्याचे सांगत मुखी राम आणि प्रत्येकाला काम अशा पध्दतीने आमचे सरकार काम करीत असल्याचेही ते म्हणाले. मुमे मे राम बगल मे छुरी असे काम आम्ही करीत नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. घरात बसून काम करणारे सरकार नसून लोकांच्या दारात जाऊन काम देणारे असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा उध्दव ठाकरे यांचा समाचार घेतला. दोवोसला पहिल्यांदा गेलो त्यानंतर केलेल्या करारांची आता ८० टक्के अमंलबजावणी झाली आहे. तर आतासुध्दा दोओसला महत्वाचे करार करण्यात आले असून त्या माध्यमातून देखील लाखो रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्टÑ अनेक विभागात पुढे असल्याचे सांगत त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे, परंतु त्यांच्यासाठी आपला दवाखाना आहे, अशी टिकाही त्यांनी केली.
सरकारच्या वतीने रोजगार दिला जायोत, तर या नमो रोजगाराच्या माध्यमातून तरुणांमध्ये उत्साह नसून महाउत्सवाचे वातावरण असल्याचेही ते म्हणाले. ठाण्यातून लवकरच मेट्रो सुरु होणार असल्याने त्याचा फायदा देखील होणार आहे. समृध्दी हायवेमुळे रोजगार वाढीसाठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत ज्या पध्दतीने स्कील डेव्लपमेंट सुरु करण्यात आले आहे, त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरु करावे अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान यावेळी त्यांच्या हस्ते कोपरीतील स्वामी विवेकानंद कौशल्य विकास प्रबोधनीचे ऑनलाईन उध्दघाटन करण्यात आले. तसेच महापालिकेच्या माध्यमातून घरगंटी आणि शिलाई मशिनच्या ११ हजार लाभार्थ्यांपैकी प्राथनिधीक स्वरुपात शिलाई मशिनचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे शहरासाठी तयार करण्यात आलेल्या उष्णता उपाय योजना कृती आराखड्याचे (हिट अॅक्शन प्लॅन) उद्घघाटनही यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र स्कोअरकार्डउद्योजकता आणि महिला उद्योजक धोरण अहवाल याचेही प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.