जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नवी मुंबईतील कामोठे भागातील अवघ्या पावणे तीन वर्षांच्या एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाºया नराधमाला २४ तासांमध्ये अटक करणाºया कामोठे पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने दिले जाणारे सर्वोत्कृष्ठ तपासाचे विशेष पदक गुरुवावारी जाहीर झाले आहे. या मुलीला न्याय मिळवून दिल्याने केलेल्या कामाचे चीज झाल्याची प्रतिक्रीया डिसुझा यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे देशभरातील १५२ पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना सर्वोत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक २०२१ हे जाहीर झाले आहे. यात महाराष्टÑातील ११ पैकी ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक डिसुझा यांचाही समावेश आहे. कामोठे पोलीस ठाण्यात डिसुझा २०१६ मध्ये कार्यरत असतांना एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला होता. त्यावेळी डिसुझा यांची साप्ताहिक सुटी होती. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेत सुरुवातीला या मुलीला त्यांनी तात्काळ नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कामोठे पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ हा गुन्हा ११ जानेवारी २०१६ रोजी दाखल केला. याच गुन्ह्याचा मोठया कौशल्याने तपास करतांना परिस्थितीजन्य पुरावा (संशयित आरोपीच्या रक्ताचे नुमुणे, रक्ताळलेले कपडे) तात्काळ गोळा केला. यामध्ये पिडितेच्या मावशीचा पतीच आरोपी असल्याचे उघड झाल्याने त्याला त्यांनी परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतांनाच तात्काळ अटक केली. याच प्रकरणात शास्त्रोक्त तसेच न्यायसहाय्यक वैज्ञानिक साधनांचा वापर करून अवघ्या एक महिना चार दिवसांमध्ये दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल केले. त्यानंतर अलिबाग (जि. रायगड) येथील सत्र न्यायालयाने सर्व पुरावे ग्राहय धरुन आरोपीला जन्मठेपेची तसेच २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्षांच्या अतिरिक्त कैदेची शिक्षाही न्यायालयाने सुनावली.*अत्यंत सचोटीने आणि जलद गतीने तरीही कौशल्याने या प्रकरणाचा तपास करुन आरोपीला अटक आणि त्याला शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणाºया डिसुझा यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाच्या गृहमंत्रालयाने केंद्राकडे पुरस्कारासाठी शिफारस केली होती. केंद्रानेही याची दखल घेत त्यांना सर्वोत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक २०२१ जाहीर केले. या मुलीला न्याय मिळवून दिल्याबद्दल खरे समाधान आहेच. शिवाय, केंद्र सरकारनेही आपल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल डिझुझा यांनी कामाचे खरे चीज झाले अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.*१९९० मध्ये उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत रुजू झालेल्या डिसूझा यांना ३१ वर्षांच्या सेवेत आतापर्यंत विविध कामगिरीबद्दल २७५ हून अधिक बक्षीसे प्राप्त झाली आहेत. कोरोनावरही त्यांनी मात करुन उत्कृष्ठ कामगिरी बजावल्याने त्यांना अलिकडेच राज्यपाल डॉ. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ममता डिझुझांना सर्वोत्कृष्ठ तपासाचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे पदक
By जितेंद्र कालेकर | Published: August 12, 2021 11:27 PM
नवी मुंबईतील कामोठे भागातील अवघ्या पावणे तीन वर्षांच्या एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाºया नराधमाला २४ तासांमध्ये अटक करणाºया कामोठे पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने दिले जाणारे सर्वोत्कृष्ठ तपासाचे विशेष पदक गुरुवावारी जाहीर झाले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे देशभरातील १५२ पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना सर्वोत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक २०२१ हे जाहीर झाले आहे. यात महाराष्टÑातील ११ पैकी ठाण्याच्या डिसुझा यांचाही समावेश आहे.
ठळक मुद्देचिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास २४ तासांत अटकन्याय मिळवून दिल्याचे झाले चीज