सदानंद नाईक
उल्हासनगर : तीन दिवसांच्या दौऱ्यात २१ कार्यक्रम घेतले असून भाजप संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचे केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी उल्हासनगर अंटेलिया येथील पत्रकार परिषदेत सांगितले. एकेकाळी भाजपचा गड असलेला लोकसभा मतदारसंघात पक्षाच्या गठबंधनचा उमेदवार राहणार असल्याचे सांगून विद्यमान खासदार शिंदे यांचे नाव घेणे टाळून संभ्रम कायम ठेवला आहे.
कल्याण लोकसभा क्षेत्राचा गेले ३ दिवस दौरा करीत असून कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह दिसला असून दौऱ्यात व्यापारी, कारखानदार, महिला, खेळाडू, कला क्षेत्रातील मान्यवर, संघटनेचे पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा केल्याचे ठाकूर यांनी सांगितले. निवडणुकीचे कोणतेही वातावरण नसताना सकाळी साडे नऊ ते रात्रीचे साडे बारा वाजे पर्यंत कार्यक्रम व्यस्त असल्याचे ते म्हणाले. पक्षा सोबत जे येथील त्यांना सोबत घेणार असून पक्षाची संघटना मजबूत करणार आहे. पक्षा पेक्षा कोणीही मोठे नसल्याने, आज देशात भाजपचा बोलबाला असल्याचे ते म्हणाले. दौऱ्या दरम्यान एसी, एसटी यासह मागासवर्गीय समाजाच्या नागरिकां सोबत बोलणे झाले. मात्र देशाच्या स्वातंत्त्र्याला ७५ वर्ष होऊनही त्यांचात शिक्षणाचा अभाव असून राहण्यास घर नसल्याचे ठाकूर म्हणाले. त्यांच्या साठी विशेष निधी व योजना लागू करण्याची शिफारस करणार असल्याचेही ते म्हणाले.
कल्याण लोकसभा क्षेत्रातील महापालिका अधिकाऱ्यांच्या सोमवारी बैठक घेतली. तेंव्हा प्रचंड तफावत आढळून आली असून केंद्र व राज्य शासनाच्या योजनेच्या माहितीचा अभाव आढळला असून काही अधिकाऱ्यांच्या कामाच्या कार्यपद्धती मुळे विकास कामना ब्रेक लागल्याचे ठाकूर म्हणाले. ३ दिवसाच्या दौऱ्यानंतर पुन्हा लोकसभेच्या दौरा करण्यासाठी येण्याचे संकेत त्यांनी दिले. उल्हासनगरातील विकास कामे येत्या दिड वर्षात करण्याचा मानस त्यांनी स्थानिक आमदार कुमार आयलानी यांच्याकडे बघून केला. यावेळी राज्याचे कैबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, गणपत गायकवाड, निरंजन गायकवाड, शहाराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, रिपाईचे शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, राजेश वधारीया, प्रकाश माखिजा, प्रदीप रामचंदानी, लाल पंजाबी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा उमेदवाराबाबत संभ्रम
कायम लोकसभा मतदारसंघाचा दौरा करण्यासाठी आलेले केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभा उमेदवार भाजप गठबंधन पक्षाचा राहणार असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेण्याचे टाळल्याने, आगामी लोकसभा उमेदवारां बाबत उत्सुकता (संभ्रम) कायम ठेवला आहे.