उल्हासनगर : केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांच्या रविवारी खास उल्हासनगर दौरा असून दौऱ्यात स्वामी शांतीप्रकाश आश्रम, चालिया मंदिर ट्रस्ट, साई वसनशहा दरबार यांच्यासह व्यापारी संघटना, डॉक्टर्स आदींना भेटी देऊन चर्चा करणार आहेत. अशी माहिती पक्षाचें शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी दिली आहे.
उल्हासनगरातील सिंधी समाजाचे पवित्र धर्मिक स्थळे, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आदी सोबत चर्चा करण्यासाठी भाजपचे केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांचा सलग तिसरा शहर दौरा आहे. कल्याण लोकसभेवर लक्ष ठेवून केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर उल्हासनगरसह कल्याण लोकसभेतील प्रमुख शहरांना भेटी देत असल्याचे बोलले जात आहे.
४ जून रोजी सकाळ पासून ठाकूर यांचा दौरा असून ते प्रथम शातीप्रकाश आश्रमाला भेट देऊन देवप्रकाश महाराज यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर चालिया मंदिर ट्रस्ट, साई वसनशहा दरबाराला भेट देऊन ट्रस्ट प्रमुखा सोबत चर्चा करणार आहेत. रामरक्षा हॉस्पिटल, सिंधू युथ सर्कल यांना भेटी दिल्यानंतर ते टॉउन हॉल मध्ये व्यापारी मंडळ पदाधिकारी सोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर भाजप जिल्हा कार्यालयाचे उदघाटन करून पत्रकार परिषद घेणार आहेत. असे प्रसिद्धपत्रक भाजप शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी काढले आहे.
कल्याण लोकसभेवर लक्ष केंद्रित करून अनुराग ठाकूर दौरा करीत असल्याचे शहरात बोलले जात आहे. गेल्या दोन दौऱ्यात शहर विकासावरून त्यांनी अधिकारी यांना धारेवर धरले होते. तसेच विकास कामासाठी निधीचे आश्वासन दिले होते. याबाबत पत्रकार परिषदेत ठाकूर काय बोलतात. याकडे।शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.