पप्पूंनी आता लग्न करुन पप्पा बनावं, रामदास आठवलेंचा राहुल गांधींना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 01:49 PM2018-12-17T13:49:45+5:302018-12-17T13:52:29+5:30
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसनं मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ता स्थापन केली आहे. या तीन राज्यांत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधींच्या नेतृत्व कौशल्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बराच बदलला आहे.
ठाणे - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसनं मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ता स्थापन केली आहे. या तीन राज्यांत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधींच्या नेतृत्व कौशल्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बराच बदलला आहे. एका परिपक्व राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आहे. यासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकतेच एक विधान केले आहे.
काय म्हणाले रामदास आठवले?
राहुल गांधींनी तीन राज्यांमध्ये चांगला विजय मिळवला आहे. ते आता पप्पू राहिले नाहीत,आता ते पप्पा बनले आहेत, असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे. राहुल गांधी यांना पप्पू म्हटलं जायचे. पण त्यांनी आता पप्पू नाहीतर पप्पा बनलं पाहिजे, माझा त्यांना हा सल्ला आहे. पप्पा होण्यासाठी त्यांनी लवकर लग्न केले पाहिजे. तुम्हाला राज्यांतील निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. राहुल गांधींनी लवकर लग्न करावं आणि पप्पा बनण्याचं काम करावं.
(राहुलजींचे नेतृत्व परिपक्व होतेय!)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केला बचाव
तीन राज्यांमध्ये भाजपाच्या झालेल्या पराभवाबाबत आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव करत म्हटले की, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव हा मोदींचा पराभव नाही. तर हा भाजपाचा पराभव आहे.
शिवसेनेला दिला हा सल्ला
शिवसेनेनं भाजपासोबत युती तोडू नये, असा सल्लाही आठवले यांनी यावेळेस दिला. जर युती कायम न राहिल्यास शिवसेनेला यामुळे नुकसान होईल. उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणुका लढण्याबाबत विचार करू नये.
Union Min R Athawale:Rahul Gandhi ko Pappu bolte they lekin mera ye sujhaav unko hai ki Pappu nahi aapko Papa hona chahiye aur Papa hone ke liye jaldi shaadi karni chahiye,aapko 3 rajyon mein safalta mili hai.Rahul Gandhi jaldi shaadi karein aur Papa ban'ne ka kaam karein.(16.12) pic.twitter.com/BR2mvtCOOa
— ANI (@ANI) December 17, 2018