ठाणे: शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत उंबरखांड येथे केंद्रीय अप्पर सचिव अरुण बरोका यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत पाहणी करीत असतांना शौचालय बांधकाम व वापर, जल जीवन मिशन माहिती, पाणी पुरवठा योजना, रस्ते, शाळा, अंगणवाडी, याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली. यावेळी 15 वित्त आयोगाबाबत मार्गदर्शन आणि चर्चाही त्यांनी केली.
यावेळी अभय महाजन, सहसचिव पाणी पुरवठा व स्वछता विभाग मंत्रालय, राहुल साकोरे प्रकल्प संचालक पाणी पुरवठा व स्वछता विभाग भाऊसाहेब दांगडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे, छायादेवी शिसोदे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा उप मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे हरीसिंग भस्मे कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद ठाणे गणेश वाडेकर राज्यसमन्व्यक पाणी पुरवठा व स्वछता विभाग आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता धुपारे, उपसरपंच दीपक निमसे, ग्रामसेवक हेमंत वेखंडे स्वच्छ भारत मिशन जिल्हा टीम त्याचबरोबर ग्रामस्थ उपस्थित होते.