लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि सेवाभावी संस्थांच्या वतीने सर्वसामान्य वाहनचालकांसाठी शुक्र वारी विनामूल्य कोविड लसीकरण शिबीर आयोजित केले आहे. या शिबिराचा लाभ महिला आणि पुरुष रिक्षा तसेच ट्रक चालकांनाही घेता येणार आहे. आरटीओ कार्यालयाने आपल्या नियमित कामाबरोबरच सामाजिक जाणीवेतून या शिबिराचे आयोजन केले आहे.कुटूंबाचा गाडा हाकण्यासाठी वाहन चालक हे कोरोना काळातही आपले काम करीत आहेत. त्यातही रिक्षा चालक हे सार्वजनिक वाहतूक करीत असल्याने त्यांचा दैनंदिन अनेक प्रवाशांशी संबंध येतो. त्यामुळे ट्रक आणि रिक्षा चालकांचे लसीकरण होणेही अत्यावश्यक आहे. त्यांच्यात लसीकरणाबाबत जागृती करण्यासाठी ठाणे आरटीओ कार्यालयाने रिक्षा आणि ट्रक चालकांसाठी हे विनामूल्य लसीकरण शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात महिला रिक्षा चालकांचेही लसीकरण केले जाणार आहे. या शिबिरात सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि सेवाभावी संस्थाही सहभागी आहेत. हे शिबिर लुईसवाडी ठाणे येथील नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात सायंकाळी ४ ते ६ या वेळेत होणार असून किमान १०० चालकांचे लसीकरण करण्याचा मनोदय असल्याचेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी सांगितले.
ठाण्यात वाहन चालकांचे होणार कोविड लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 11:31 PM
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि सेवाभावी संस्थांच्या वतीने सर्वसामान्य वाहनचालकांसाठी शुक्र वारी विनामूल्य कोविड लसीकरण शिबीर आयोजित केले आहे. या शिबिराचा लाभ महिला आणि पुरुष रिक्षा तसेच ट्रक चालकांनाही घेता येणार आहे.
ठळक मुद्दे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अनोखा उपक्रम