लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मुंबई विद्यापीठाचे कल्याण येथील उपकेंद्र जूनमध्ये सुरू करण्याचे आश्वासन न पाळल्याने स्टुडंट अॅक्शन फ्रंट या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पुन्हा कुलगुरू संजय देशमुख यांची भेट घेतली. त्यावर १ आॅगस्टला उपकेंद्राचा शुभारंभ केला जाईल, असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. संघटनेचे प्रमुख व माजी विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. प्रशांत इंगळे, पदाधिकारी सुशील साळवे, राहुल इंगळे, महेंद्र ठोंबरे यांच्या शिष्टमंडळाने देशमुख यांची भेट घेतली. यावर त्यांनी लवकरच विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू केले जाईल, अशी ग्वाही दिली. संघटनेच्या मते यापूर्वीही जूनमध्ये उपकेंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र, ते पाळण्यात आले नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी देशमुख यांच्याकडे तारखेचा आग्रह धरला. त्यावर देखमुख यांनी १ आॅगस्टपासून उपकेंद्राचा शुभारंभ करून त्यातून कामकाज सुरू होईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे टळलेला शुभारंभ आत्ता १ आॅगस्ट रोजी होणार आहे. एक मजली वास्तू तयारविद्यापीठ उपकेंद्रासाठी १३ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. विद्यापीठाच्या उपकेंद्र बांधणीवर विद्यापीठाने ४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपये खर्च झाला आहे. जवळपास २० खोल्यांची एक मजली वास्तू बांधून तयार आहे. एम. टेकचे प्रवेश सुरू होणार?यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच वास्तूत कामकाज सुरू व्हावे, अशी मागणी होती. आॅगस्ट एक तारखेपासून उपकेंद्र सुरू झाल्यास एम. टेकचे प्रवेश या केंद्रातून दिले जातील. तसेच दूर शिक्षणासाठी कल्याण, कसारा, कर्जत परिसरातील कॉलेजमधील विद्यार्थ्याना प्रवेश घेता येणार आहे. या उपकेंद्रासाठी समन्वयकाची जबाबदारी डॉ. उकरांडे यांच्याकडे देण्यात आली असल्याचे प्रा. इंगळे यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचा १ आॅगस्टला मुहूर्त
By admin | Published: July 08, 2017 5:43 AM