ठाणे : राज्य शासनाच्या निर्णयानंतर जवळपास पाच महिन्यांनी गुरुवारपासून अखेर एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली. ठाणे जिल्ह्यातील सर्वच आगारांतून पहिल्या दिवशी प्रवाशांच्या प्रतिसादानुसार एसटी बस सोडण्यात आल्या. मात्र, आता हळूहळू ठाण्यातून विविध मार्गांवर एसटी सोडण्यात येणार असून त्यांच्या फेºयाही वाढवण्यात येणार आहे. ठाण्यातील पाचही आगारांतून मिळून २३ मार्गांवर जाणाºया ३६ आणि परतीच्याही ३७ फेºया होणार आहेत.
लॉकडाऊननंतर अनेक महिन्यांनी पहिल्या दिवशी ठाण्यातून तीन मार्गांवर ११ एसटी सोडण्यात आल्या. त्याला प्रवाशांचा प्रतिसादही अल्प होता. मात्र, पहिलाच दिवस असल्याने प्रवासीसंख्याही कमी राहील, असा एसटीच्या अधिकाऱ्यांनाही अंदाज होता. परंतु, एसटी सुरू झाल्यावर प्रवाशांची संख्या वाढेल, अशीही त्यांना आशा आहे. त्यानुसार, राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभागाकडून टप्प्याटप्प्याने आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाचही आगारांतून २३ मार्गांवर एसटी सोडल्या आहेत. त्यातही जास्त संख्येने प्रवास होणाºया मार्गांवर फेºया वाढवण्यात आल्या आहेत. या प्रवासासाठी प्रवाशांना कोणत्याही ई-पासची आवश्यकता नसेल. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून केलेले सर्व नियम पाळले जाणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग राखले जाणार आहे.असे आहेत बसचे मार्गठाणे-स्वारगेट मार्गावर ७ बस, बोरिवली-स्वारगेट मार्गावर ४, कल्याण-स्वारगेट-२, कल्याण-अहमदनगर-३, शहापूर-नाशिक-२ आणि ठाणे-सातारा या मार्गावर २ बस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय ठाणे-दहिवडी, ठाणे-जुन्नर, ठाणे-चिपळूण, ठाणे-नारायणगाव, भिवंडी-संगमनेर, भिवंडी-जुन्नर, भिवंडी-अहमदनगर, भिवंडी-कल्याण-श्रीवर्धन, कल्याण-भोरगिरी, कल्याण-कोल्हापूर, कल्याण-शिवथरघळ, कल्याण-अक्कलकुवा, कल्याण-शिवाजीनगर, विठ्ठलवाडी-इस्लामपूर, विठ्ठलवाडी-गोंदवले, वाडा-कल्याण- अहमदनगर, वाडा-ठाणे-स्वारगेट या मार्गांवर प्रत्येकी एक बस सोडण्यात येणार आहे.