डोंबिवली : राज्य सरकारचं मिशन बिगीन अगेन सुरू झाल्यानंतर नोकरदार वर्ग मोठ्या संख्येनं कामावर जाण्यासाठी बाहेर पडला आहे. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा कल्याण डोंबिवलीत नोकरदारांचे मोठे हाल झाले. त्यासाठी मध्य रेल्वेने विशेष लोकल सोडाव्यात, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.
डोंबिवली, दिवा आणि कल्याणमध्ये बससाठी भली मोठी रांग लागली होती. आजही या रांगेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. डोंबिवलीत अगदी फडके रोडपर्यंत ही रांग गेली होती. तर दुसरीकडे कल्याण एसटी डेपोत बसमध्ये चढण्यासाठी नोकरदारांची एकच झुंबड झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईला दररोज किती लोक प्रवास करतात, याचा अंदाज आल्यानंतर तरी गर्दीच्या वेळी बसेसची संख्या वाढवण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे. दरम्यान, या नोकरदारांसाठी अंतरनियम (सोशल डिस्टन्स) ची काळजी घेऊन काही विशेष लोकल्स सोडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
लोकमतच्या हॅलो ठाणे मध्ये गेले दोन दिवस ''प्रवासासाठी 5 तास'' अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध होत असून त्याची दखल घेत पाटील यांनी ही मागणी केली आहे. सामान्यांची व्यथा त्यामधून व्यक्त झाली असून रेल्वे हा एकमेव पर्याय असून त्यामधून प्रवासाची मुभा देणे गरजेचे असून त्या दरम्यान फिजिकल डिस्टन्स कसे पाळले जाईल, याचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
चार दिवसांनंतर आज सोने स्वस्त होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण
CoronaVirus मुंबईने 'जन्मदात्या' वुहानला मागे टाकले; दिल्ली दुसऱ्या नंबरवर
भित्रा पाकिस्तान! अफवा पसरली, 'अज्ञात विमाने हवेत उडाली'; अख्ख्या कराचीची वीज घालवली
धक्कादायक! कार्टुन पाहू न दिल्याने १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; पुण्यातील प्रकार
नगरसेवक मुकुंद केणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारावेळी निधन
बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले; दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची लूट
ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; माजी खासदारावर 25000 कोटींच्या घोटाळ्याचे गुन्हे
आजचे राशीभविष्य - 10 जून 2020; मकर राशीला पदोन्नती मिळण्याचे योग