मुंबई : कोरोनाच्या काळातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचा आजचा पहिला दिवस असून खासगी कंपन्यांची कार्यालये १० टक्के मनुष्यबळासह सुरु होत आहेत. तर अन्य कर्मचाऱ्यांना घरूनचा काम करावे लागणार आहे. शॉपिंग मॉल, हॉटेल, धार्मिक स्थळे तूर्त खुली केली जाणार नाहीत. तसेच लोकल, परिवहन सेवा, रिक्षा-टॅक्सी यांच्यावरील सध्याचे निर्बंध कायम असतील.
दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कर्जतहून सोडण्यात आलेल्या ट्रेन, लोकलमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांचीही तोबा गर्दी झालेली पहायला मिळाली. कल्याणहून सुटलेल्या लोकलमध्ये एका सीटवर एकच पाहिजे असा नियम असताना उभ्याने प्रवास केला जात आहे. तर ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्स कसे ठेवायचे, असा सवाल त्रस्त कर्मचाऱ्यांनी केला. या गाडी मध्ये कॉन्ट्रॅक्टरची माणसे आहेत. तसेच बाहेरील माणसे सुध्दा चढतात. कोणी चेक करायला सुध्दा येत नाही. याची दखल घ्यावी, असेही रेल्वे कर्मचारी सांगत आहेत.
असाच प्रकार डोंबिवलीचही पहायला मिळाला. एसटी बससाठी रांगा लावण्यात आल्या. मात्र, बस येताच कोरोनाच्या आधी व्हायची तशी प्रवाशांची झुंबड उडाली होती. बसमध्ये प्रवेश करण्य़ासाठी साऱ्यांनीच जोर लावत आतमध्ये जाण्याचा प्रयत्न चालविला होता. यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Unlock 1: कोरोनाच्या दहशतीत कार्यालये उघडण्याचा पहिला दिवस; मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी
Unlock 1: डोंबिवलीत कामावर जाण्यासाठी भल्यामोठ्या रांगा; पण वाहनेच नाहीत
UnlockDown 1: लॉकडाऊन उघडताच योगी आदित्यनाथांनी केले 'हे' काम