ठाणे : शिवराज बांगर यांच्यासोबत न झालेले व्हाॅट्सॲप चॅट मॉर्फ करून व्हायरल केले. यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ॲड. रुपाली ठोंबरे यांची भूमिका हास्यास्पद असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला.
वादग्रस्त चॅट व्हायरल झाल्यानंतर आव्हाड यांनी सर्व बनाव असल्याचा दावा केला. ठोंबरे या वकील असूनही सत्य-असत्य न तपासता त्यांनी हा मॉर्फ केलेला चॅट व्हायरल केला. ३ वाजून ७ मिनिटांनी भाषण संपले आणि तीन वाजून २६ मिनिटांनी हा चॅट अवतरला, असे आव्हाड म्हणाले.
धर्म, जातीद्वेषी मानसिकताच उघड - चॅटवरील व्हॉट्सॲप डीपीवरही आपला फोटो नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. कितीही रागात असलो तरी अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करीत नाही. - हे खोटे चॅट व्हायरल करताना ‘दलित आणि मुस्लिमांना पैसे देऊन बोलव,’ असे वाक्य आपल्या तोंडून निघाल्याचे दाखविले. - असे दाखवितानाही हे चॅट करणाऱ्यांची धर्म, जातीद्वेषी मानसिकताच उघड झाली. त्याचबरोबर दीपक केदार याची आणि माझी कुठेतरी एकदाच भेट झाली. दोन ते तीन वेळा त्याच्याशी बोलणे झाले, असे ते म्हणाले.
स्वत:च्याच पायावर कुऱ्हाडआपल्या ज्या नंबरचा वापर मॉर्फ चॅटिंगसाठी केला. तो नंबर साधा व्हॉट्सॲप आहे. ज्यांनी खोटी चॅट तयार केली त्यांनी या नंबरवरील व्हॉट्सॲप बिझनेस असल्याचे दाखविले. कोणाला तरी खूष करण्याच्या नादात स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आणि उघडे पडले, असेही आव्हाड पुढे म्हणाले. वाल्मीक कराडने जंग जंग पछाडलेबीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक खेडकर यांना भेटून संदीप क्षीरसागर, राजेश देशमुख, सातपुते आणि शिवराज बांगर यांनी गुन्हा नोंदविलेला आहे. बांगरच्या कुटुंबीयांना आयुष्यातून उद्ध्वस्त करण्यासाठी वाल्मीक कराडने जंग जंग पछाडले. बांगर हा गरीब कुटुंबातील असल्याने पोलिसही त्याच्यावर गुन्हे नोंदवितात.