शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणुका लागणार; लोकसभेच्या तीन रिक्त जागा, पैकी एक राज्यातील
2
अब्दुल सत्तारांची भाजपावर कुरघोडी; फुलंब्रीमधून समर्थकाची उमेदवारी केली जाहीर
3
७ आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार
4
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
5
काय आहे PM इंटर्नशिप योजना?, १.५५ लाखाहून अधिक अर्ज; दरमहिना मिळणार ५ हजार रुपये
6
निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
7
८० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला ५ राजयोग: १० राशींना लाभ, धनलक्ष्मी कृपा; अपार यश, शुभच होईल!
8
Swami Samartha: विकत किंवा भेट मिळालेली स्वामींची मूर्ती घरी स्थापन कशी करावी? वाचा नियम!
9
पाकिस्तानसह 'भारत'ही हरला! न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये; टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर
10
न्यूझीलंड विरूद्ध उद्यापासून टीम इंडियाची 'कसोटी'; विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडण्याची रोहित शर्माला संधी
11
Munawar Faruqui : आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
12
Hyundai Motor India IPO : ह्युंदाईचा आयपीओ उघडताच ८% सबस्क्राइब, पण ग्रे मार्केटमध्ये ९२ टक्क्यांपर्यंत घसरण
13
नेत्यांची उडाली झोप! बँकेच्या क्लर्कने काढले सर्वांचे अकाउंट डिटेल्स, पंतप्रधानांसह अनेकांना धक्का 
14
'रंगभूमीचं मोठं नुकसान...', अतुल परचुरेंच्या निधनानंतर वंदना गुप्ते भावुक; शेअर केला फोटो
15
Baba Siddique : धक्कादायक! गुरमेल आणि झिशानची जेलमध्ये भेट; १० महिने एकत्र राहिले, चांगली मैत्री झाली अन्...
16
'फुलवंती' वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली का? प्राजक्ता म्हणाली, "हा माझा स्वभाव नाही की मी..."
17
शिक्षण क्षेत्रातील आधारवड हरपला, माजी प्र-कुलगुरू अशोक प्रधान यांचे निधन 
18
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
19
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
20
मी पुन्हा येईन... कर्मचाऱ्याने असा काही राजीनामा दिला की, होईल २०१९ च्या निवडणुकीची आठवण

मनपाजवळच्या शाळांवर उपेक्षित शिक्षक, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 1:42 AM

राजकीय पुढा-यांच्या आशीर्वादाने महापालिका, नगरपालिकांजवळच्या शाळांवर वर्षानुवर्षे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना

ठाणे : राजकीय पुढा-यांच्या आशीर्वादाने महापालिका, नगरपालिकांजवळच्या शाळांवर वर्षानुवर्षे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना या आॅनलाइन बदल्यांद्वारे पायउतार व्हावे लागत आहे. त्यांच्या जागी जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागात वर्षानुवर्षे काम करणारे उपेक्षित अपंग शिक्षक, पती-पत्नी एकत्रिकीकरणाचे शिक्षक, विधवा आणि परित्यक्ता आदी शिक्षकशिक्षिकांची प्राधान्याने बदली झाली आहे. यामुळे शहर सोडून ग्रामीण, आदिवासी-दुर्गम भागांत सुमारे ३७४ शिक्षकांच्या बदल्या निश्चित झाल्या आहेत.या आॅनलाइन बदल्यांमध्ये कल्याण तालुक्यातील शहरी भागाजवळील सुमारे १०० शिक्षकांची उचलबांगडी झाली आहे. याप्रमाणेच अंबरनाथ तालुक्यातील ४४, भिवंडीमधील ५२ शिक्षकांची शहरी भागांजवळच्या शाळांमधून बदली होत आहे. त्यांच्या जागी शहापूर तालुक्यातील १३१ व मुरबाडमधील ४७ शिक्षकशिक्षिकांची मनपा-नगरपालिका शहराजवळच्या शाळांमध्ये प्राधान्यक्रमाने बदली होत आहे. या शिक्षकांमध्ये सुमारे ३७४ शिक्षकांचा समावेश आहे.राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या २७ फेब्रुवारीच्या अध्यादेशानुसार या आॅनलाइन बदल्यांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यातील शिक्षकांना पसंतीच्या शाळांची नावेदेखील आॅनलाइन मागवून घेतली आहेत. या बदल्या जिल्ह्यांतर्गत होत आहेत. या बदल्यांसाठी चार संवर्गांत शिक्षकांची विभागणी केली आहे. यामध्ये अपंग, विधवा व ५३ वर्षांपेक्षा जास्त वयोमानाच्या शिक्षकांचा प्रथम संवर्र्ग, तर मुख्यालयापासून ३० किलोमीटर अंतरावरील पतीपत्नी एकत्रिकीकरणाचा दुसरा संवर्ग आणि अवघड क्षेत्रातील शाळा या तीन क्रमांच्या संवर्गांमधील आहेत. या शाळांमधील शिक्षकांनी मनपा व नगरपालिकांच्या शहराजवळच्या पसंतीच्या शाळांची मागणी केली आहे. त्यामुळे चौथ्या संवर्गात मोडणाºया शहराजवळील शाळांमधील शिक्षकांची तडकाफडकी आॅनलाइन बदली झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका